"राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Рама
No edit summary
ओळ ३१:
}}
'''राम''' ([[संस्कृत भाषा|संस्कॄत]]: राम ; [[कन्नड भाषा|कन्नड]]: ರಾಮ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: இராமன் ; [[तेलुगू भाषा|तेलुगू]]: రామ ; [[बर्मी भाषा|बर्मी]]: ရာမ , ''जामा'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: ''लोमो'' ; [[जावी भाषा|जावी]]: ''रामविजया'' ; [[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ព្រះ​រាម , ''फ्र्या र्‍याम'' ; [[लाओ भाषा|लाओ]]: ພຣະຣາມ , ''फ्रा लाम'' ; [[मलय भाषा|मलय]]: ''मगात श्री रामा'' ; मारानाव भाषा: मांगांदिरी; [[तागालोग भाषा|तागालोग]]: ''राजा बांतुगान''; [[थाई भाषा|थाई]]: พระราม , ''फ्रा राम'' ;) हा [[अयोध्या|अयोध्येचा]] राजा होता. [[रामायण|रामायणाचा]] महानायक असलेला राम [[विष्णू|विष्णूचा]] सातवा अवतार मानला जातो. तो [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] अयोध्येचा राजा [[दशरथ]] व त्याची प्रथम पत्नी [[कौसल्या]] यांचा पुत्र होता. त्याचा [[जनक|जनककुळातील]] [[सीरध्वज जनक|सीरध्वज जनकाच्या]] [[सीता]] या कन्येशी विवाह झाला.
 
==प्रभाते मनी राम चिन्तीत जावा...==
प्रभू रामाचं चरित्र अनेकांनी गायिलेलं आहे. मराठीत भावार्थरामायण आहे, रामविजय आहे. हिन्दीत रामचरितमानस आहे, बंगालीत कृत्तिवासरामायण, तर तामीळमध्ये कंबरामायण! रामाचीकथा प्रत्येक भाषेला ‘आपली' वाटली आणि प्रत्येक कवीनं आपापल्या कल्पनेनुसार त्यात अनेक उपकथानकं जोडून ती कथा अधिकाधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला! पण, त्यामुळे एकगोंधळ झाला! स्थल-कालांच्या संदर्भात फरक दिसू लागला. कोणत्या रामकथेला खरं मानावं? उत्तर एकच! रामाचा समकालीन असणारया महर्षी वाल्मीकींच्या लेखणीतून अवतरलेली मूळरामकथाच प्रमाण मानायची!
 
मूळ वाल्मीकीरामायण, पं. सातवळेकरांचं भाष्य, वं.मावशींची (केळकर) प्रवचनं, श्रद्धेय गुरुचरण स्वामी गोविददेवगिरी यांची प्रवचनं... या सर्वांतून मी राम शोधत गेले. तटस्थ दृष्टीनं विचार केला तर राम हा एक क्षत्रिय राजकुमार. श्रीरामानं स्वत: कधीच म्हटलं नाही की मी ईश्वराचा अवतार आहे.
 
‘आत्म्यानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' हे त्याचं प्रांजळवचन वाल्मीकीनं नोंदवलं आहे. मग श्रीरामाच्या नेमक्या कोणत्या कृत्यामुळे तो ‘नरा'चा नारायण बनला? आज प्रभू रामावर असेही आक्षेप घेतले जातात की, त्यानं स्त्रीवध (ताटिका वध) केला, ब्रह्महत्या (रावणवध) केली, कपट (वालिवध) केलं, निष्कलंक आणि पतिपरायण अशा धर्मपत्नीचा त्याग केला. मग तरीही रामपूजनीय आणि आदर्श का ठरला ? रामायणाच्या संदर्भात एक मार्मिक कथा सांगितली जाते ती अशी- वाल्मीकीने शतकोटी प्रविस्तर रामायण रचलं. ही जगातली पहिली काव्यरचना! साहजिकच, देव, दानव, मानव यासर्वांना वाटू लागलं की, हा ग्रंथ आम्हालाच हवा. वादाचानिर्णय लावला श्रीमहादेवानं. त्यानं तिघांनाही१/३ रामायण वाटून दिलं. प्रत्येक समूहाच्या वाट्याला शतकोटींपैकी ३३३३३३३३३ श्लोकआले. तरीही एक श्लोक उरलाच! रामायणाचं वृत्त अनुष्टुभ. त्यात ३२ अक्षरं असतात. त्यांची तिघांत समानवाटणी कशी होणार? तेव्हा महादेवानं प्रत्येक गटाला दहा दहा अक्षरं देऊन दोनअक्षरं मात्र स्वत:कडे ठेवून घेतली. ती दोन अक्षरं म्हणजे ‘रा' आणि ‘म.'‘शतकोटींचे बीज' ते हेच! ‘लवथवतीविक्राळा' या आरतीत समर्थ रामदासांनीहेच आवाहन केलेलं आहे की, शतनोटिप्रविस्तर रामायणाचा बीजमंत्र असणारं ते नाम सदैव उच्चारा आणि हृदयस्थ आत्मारामाला जागवा! शतकोटींचे बीज वाचे उच्चारी!
 
अस्तु! वरची कथा रंजक आहे खरी, पण तिचं मोल फक्त रंजनापुरतं नाही. कथेचं मर्म हे की, रामायणातलं सारभूत तत्त्वफक्त शिवशंकरच ओळखू शकला! म्हणूनच तो ‘महा'देव झाला. इतर सर्व जण फक्त कथानकावर- दाणा काढून घेतलेल्या टरफलावरच- संतुष्ट! रामकथेचं पारायण करण्यापेक्षाही राम‘परायण' होणं अधिक श्रेयस्कर, हे यातलं मर्म! रामचरित्राला वाल्मीकीनं ‘रामायण' म्हटलं हे खरं आहे. एतदाख्यानमायुष्यं पठन् रामायणं नर:Ÿ।(सपुत्रपौत्र: सगण: प्रेत्य स्वर्गे महीयतेŸ।। परंतु या ग्रंथाचं मुख्य शीर्षक ‘दशशिरसो वधम्'किवा ‘पौलस्त्यवधम्' असं असावं. पाहा-रघुवरचरितं मुनिप्रणीतंदशशिरसश्च वधं निशामयध्वम्Ÿ।।तसेच काव्यं रामायण कृत्स्नं सीमायाश्चरितं महत्Ÿ।पौलस्त्यवधमित्येव चकार चरितव्रत:Ÿ। आता आपण ‘रामायण' शब्दाचा अर्थ पाहू. ‘अयनम्' यासंस्कृत शब्दाचा अर्थ आहे गती/गमन (मार्च) उत्तरायण,दक्षिणायन इ. शब्दातही हाच अर्थ आहे. सूर्याचं दक्षिणेकडे गमन म्हणजे दक्षिणायन. तेव्हा रामायण म्हणजे रामाचं गमन. मात्रश्रीरामाचं वनवासगमन येथे अभिप्रेत नसून त्याची लंकेवरीलस्वारीच महर्षी वाल्मीकींना अभिप्रेत असावी, असं ‘पौलस्त्यवध' किवा ‘दशशिरसो वध' या शीर्षकावरून स्पष्ट होतं.
 
मग रावणासारख्या अत्याचारी हुकूमशहाचा अंत करणं यातच श्रीरामाचं देवत्व आहे का? ‘विनाशाय च दुष्कृताम्' हे अवतार घेण्यामागचं उद्दिष्ट पुढे द्वापरयुगात श्रीकृष्णानं सांगितलं आहे! पण डोळस नजरेनं रामायणाचं अध्ययन केल्यावर कळून येतंकी, फक्त रावणवधा मुळेच श्रीराम हा नराचा नारायण झालेला नाही. प्रभू रामाच्या आधीही बळीराजानं(राक्षसवंशीयानं) रावणाला पराभूत केलं होतं. तीच गोष्ट सहस्रार्जुन कार्तवीर्याची. (मानवाची).त्यानंही रावणाला पकडून बंदिवासात ठेवलं होतं. वानरराज वालीनं तर रावणाची दाणादाण उडवली होती! तेव्हा श्रीरामाचं श्रेष्ठत्व फक्त रावणाला पराभूत करण्यातनाही हे निश्चित. कारण ते काम तर प्रभूरामाच्या आधीही तिघांनी केलं होतं. श्रीरामाचं श्रेष्ठत्व दडलं आहे त्याच्या मनोभूमिकेत!
 
बळीराजानं रावणाला बंदी केलं खरं, पण रावणपिता विश्रवामुनी बळीकडे याचक म्हणूनगेला आणि पुत्राच्या सुटकेची भिक्षा मागितली. आणि बळीनं बिनदिक्कत ती मान्यही केली! ‘बळीकडून याचक कधीही निराशकेला जात नाही' ही कीर्ती त्याला टिकवून ठेवायची होती! स्वत:ची वैयक्तिक प्रतिमा जपणं त्याला महत्त्वाचं वाटलं, पण जनतेला तापदायक ठरलेल्या अत्याचाराला मुक्त करणं समाजहिताला बाधक ठरेल, हा विचारही त्याच्या मनात आला नाही! म्हणूनच, पराक्रम असूनही, दातृत्व असूनही, चिरंजीवित्वलाभूनही शेवटी विष्णूच्याच एका अवताराला (वामनाला) त्याला पाताळात दडपून टाकावं लागलं! सहस्रार्जुनानंही तेच केलं. रावण त्याच्या बंदिवासात होता. विश्रवामुनीनं त्याच्याकडे पुत्राच्या मुक्ततेची याचना केली. ‘क्षत्रियराजानं तपस्वी ब्राह्मणाच्या याचनेला नकार देऊ नये' या भाबड्या समजुतीपायी सहस्रार्जुनानं रावणाला मुक्त केलं. स्वत:चा क्षात्रधर्म आपण अबाधित राखला असं त्याला वाटलं. पण ते खरं होतं का? वस्तुत: ‘क्षतात् त्रायते' (संकटापासून सोडविणारा) तो क्षत्रिय!रावणरूपी संकटाला मोकाट सोडून कोणता धर्म राखला त्यानं? स्वत:चं पुण्य संपादण्याच्या अतिरेकापायी राष्ट्राचं अहित होतं तेअसं! बळी आणि सहस्रार्जुन या दोघांनीही व्यष्टीच्या हितापोटी समष्टिहिताला तिलांजलीच दिली!
 
वालीचा प्रसंग मात्र थोडा वेगळा आहे. वाली पराक्रमी खरा, पण भोळा होता. उलट रावण पक्का मुत्सद्दी! वालीनं रावणाला सळो की पळो करून सोडलं होतं. रावणानं सामोपचाराचं धोरण स्वीकारलं. वालीची स्तुती केली. ‘तुझ्या पराक्रमानं मी दीपूनगेलो. माझ्या तोडीचा फक्त तूच. तेव्हा आपण अग्नीला साक्षी ठेवून मैत्री करूया' असा प्रस्ताव मांडला. या तथाकथित अग्निसाक्षिक मैत्रीच्या अटी पाहिल्या वरच कळतं की रावण अजिक्य का ठरला! वालीचा भोळेपणाही ध्यानी येतो.‘आपल्यापैकी कुणावरही परचक्र आलं तर परस्परांना मदत करायची' हा पहिला ठराव! वस्तुत: वालीला मदतीची गरजच कुठे होती? त्यानंच तर रावणाची दाणादाण उडवली होती. पण वाली शब्दजालात गुरफटला, दुसरा ठराव म्हणजे ‘वालीच्या मदतीसाठीरावणाचं १४००० सैन्य सदैव दंडकारण्यात राहील.' वस्तुत:दंडकारण्य ही वालीच्या किष्किंधा राज्याची सीमा! (कावेबाजशत्रूला राज्याच्या सीमेपाशी वाव दिल्यास तो किती आणि कसाधुडगूस घालू शकतो, हे भारतीयांना सांगायला नकोच!) वालीनंहाही ठराव सहर्ष स्वीकारला.
 
रावणाचा मुत्सद्दीपणा पाहा. वालीकडून तर त्याला आक्रमणाचं भय नव्हतंच. पण उत्तरेच्या आर्यावर्ताशी त्याची पुढेमागे युती झाली तर...! म्हणूनच आर्यावर्त- किष्किंधेच्या सीमाप्रदेशात- म्हणजेच दंडकारण्यात रावणानं हेतु पुरस्सर आपलं सैन्य ठेवलं. बलाढ्य वालीला चतुराईनं एकटं पाडलं आणि भाबडावाली त्यालाच ‘सख्य' समजत राहिला! राज्यकत्र्याला असंगाफील राहून चालतं का? रावणाला पराभूत करण्याचं शौर्यवालीत होतं, पण राष्ट्ररक्षणाचा पोच मात्र नव्हता.
 
या सर्व पाश्र्वभूमीचा विचार केल्यास प्रभू रामाचं श्रेष्ठत्वनेमकं कशात होतं, हे कळणं अवघड नाही. रावणाशी सख्य करणारया वालीच्या जागी सुग्रीवाची स्थापना करून संपूर्ण उत्तर-दक्षिण जम्बुद्वीप त्यानं एकसंध केलं. हेच त्याचं अवतारकार्य.
 
रघुवंशात श्रीरामापूर्वीही दिलीप, रघु, अज, दशरथ असेम हाप्रतापी शासक होऊन गेले. दानवांशी लढताना प्रत्यक्ष इन्द्रालाही त्यांचं साहाय्य घ्यावं लागत असे, असा त्यांचा पराक्रम! पण तरीही रावणी अत्याचाराला (आजच्या शब्दात बोलायचं तरआतंकवादी कारवायांना) आळा घालणं मात्र कुणालाही जमलंनाही. ती दृष्टीत नव्हती! श्रीरामप्रभूनं मात्र स्वत:च्या पराक्रमाचा उपयोग जनतेला निर्भय करण्यासाठी केला. उत्तर दक्षिण दुभंगलेलंजम्बुद्वीप एकसंध करण्याचं अभूतपूर्व कृत्य केलं. खरे तर सीतामाईला सोडवून श्रीराम रावणाला जीवदान देऊ शकले असते. तसं केल्यानं रामाचा पराक्रमही सिद्ध झाला असता, शिवाय क्षमाशील, परमकारुणिक म्हणून त्याच्या गुणगौरवात भरही पडलीअसती! पण एका रावणाला जीवदान देण्यापेक्षा संपूर्ण समाजाला अभय देणं अधिक श्रेयस्कर आहे, स्वत:च्या तुरयात एक पीस अधिक खोचून घेण्यापेक्षा राष्ट्रहिताची जपणूक अधिक मोलाची आहे, व्यष्टीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे, हा विवेक श्रीरामाला क्षणभरही सोडून गेला नाही. त्यामुळेच तो नराचा नारायण झाला.
प्रत्येकाच्या मुखी येऊ लागलं की
 
माता रामो, मत्पिता रामचन्द्र:Ÿ।स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्र:Ÿ।।
 
प्रभू राम हा आदर्शाचा, मांगल्याचा, अचूकतेचा नि रसवत्तेचा पर्याय बनला आणि सुजनांच्या मनात दाटून आलं की, ‘प्रभाते मनीराम चिन्तीत जावा...'
 
{{कॉमन्स वर्ग|वर्ग:Rama|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राम" पासून हुडकले