"ला जेटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो वर्गीकरण
ओळ १:
'''ला जेटी''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''La jetée'' ) हा इ.स. १९६२ सालचा [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेतील]] विज्ञानपट गटातील कृष्णधवल लघुचित्रपट आहे. कालप्रवासाच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस मार्करने केले होते. चित्रपटाची लांबी फक्त २८ मिनिटे इतकी आहे. हा लघुचित्रपट असला, तरी हा चलचित्रपट नसून यात स्थिर चित्रांची सलग मालिका आहे. कथेतील पात्रांना थेट संवाद नसून पार्श्वभूमीला निवेदकामार्फत प्रसंगानुरूप निवेदन आहे. टाईम मासिकाने इ.स. २०१० साली कालप्रवासावर आधारित सर्वोत्कृष्ट विज्ञानपटांत याला स्थान दिले होते.
 
या चित्रपटावरूनच प्रेरित होऊन टेरी जिलिअम या दिग्दर्शकाने इ.स. १९९५मध्ये ट्वेल्व्ह मंकीज हा इंग्रजी चित्रपट बनवला होता.
 
==कथानक ==
==कथा==
ज्याला आपल्या लहानपणची एका क्रूर घटनेची आठवण त्रास देत असते, पण त्या घटनेचा अर्थ काही वर्षांनी कळतो, अशा माणसाची ही कथा आहे. तिसरया महायुद्धापूर्वी एका संध्याकाळी एक लहान मुलगा आपल्या आईवडलांबरोबर पॅरीसच्या ऑर्ली विमानतळावर फिरण्यासाठी गेला असतां, त्याला तेथे एक तरुणी दिसते. थोड्याच वेळात तिचा चेहेरा आणि भोवतालच्या जमावातील माणसांचे भेदरलेले चेहरे पाहून त्याला कळते की, तेथे कोणाचातरी मृत्यू झालेला आहे.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:फ्रेंच भाषेमधील चित्रपट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ला_जेटी" पासून हुडकले