"भाषांतरित-रूपांतरित नाटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले. विल्यम [[शेक्सपियर | शेक्सपियरच्या]] ३६ नाटकांपैकी २७ नाटकांची मराठीत भाषांतरे वा रूपांतरे झालीआहेत.त्यासर्व नाटकांची यादी याच विकिपीडियावर [[शेक्सपियर]] या लेखात आली आहे. त्याशिवाय अमराठी भाषांतून अनेक नाटके मराठीत आली. त्या बहुतांशी नाटकांची नावे पुढे दिलेल्या तक्त्यात दिली आहेत. ही यादी अर्थात परिपूर्ण असणे शक्य नाही; आणि जशीजशी नवीन रूपांतरित नाटके मराठीत येतील, तशीतशी या यादीत सतत भरच पडत जाईल.
 
'''मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :'''