"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३:
'''विषमज्वर''' हा जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार आहे. '''टायफॉइड''' ला मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात. सालमोनेला टायफी या जिवाणूचा संसर्ग झाल्याने विषमज्वर होतो.
 
कोंबड्या आणि अंड्यामधून पसरणार्‍या अन्न विषबाधेचे कारण असणार्‍याअसणाऱ्या साल्मोनेला रोगाचे आणि मानवी मुदतीच्या तापाचे कारण एकाच कुलातील जिवाणू आहे. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता तीव्र ताप येणे हे त्याचे लक्षण आहे.
 
==वर्णन==
सालमोनेला टायफी हे जिवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जिवाणू पसरू शकतात. टायफॉइड बरा झालेल्या रुग्ण सुद्धा जिवाणूचा वाहक असतो. टायफॉइड बरा झालेले सुमारे तीन टक्के रुग्ण सालमोनेलाचे वाहक असतात. मुदतीचा ताप आजार एका व्यक्तीकडून दुसर्‍यादुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे कारण अस्वच्छ सवयी. शौचानंतर हात गडबडीने धुणे किंवा हात स्वच्छ न करणे हे त्याचे एक कारण. रोगाचा वाहक असलेल्या व्यक्तीने हाताळलेल्या अन्नामुळे टायफॉइडची साथ पसरते. एका अशा व्यक्तीस ‘टायफॉइड मेरी’ असे नाव दिले गेले आहे. जगाच्या काहीं भागामध्ये अस्वच्छतेमुळे टायफॉइड हा गंभीर प्रश्न झाला आहे. दर वर्षी सुमारे १ कोटी साठ लाख व्यक्ती टायफॉइडने आजारी पडतात.
==कारणे आणि लक्षणे==
ओळ १४:
रक्तामधील मोठ्या संख्येने असलेल्या सालमोनेला जिवाणूमुळे आलेला ताप वाढ्त जातो. उपचार न घेतलेल्या रुग्णामध्ये अशी स्थिति चार ते आठ आठवडे राहते. टायफॉइडची दुसरी लक्षणे म्हणजे प्रारंभीच्या काळात मलावरोध,अशक्तपणा, डोकेदुखी,सांधेदुखी, आणि पोटावर पुरळ.
 
रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील सालमोनेला मुळे लहान आतड्यास छिद्र पडू शकते. असे झाल्यास लहान आतड्यातील अन्न आणि द्रव उदरपोकळीत शिरल्यास उदर पोकळी आंतरावरण दाह आणि शोथ होतो. हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणार्‍याहोणाऱ्या मृत्यूचे कारण आहे.
 
टायफॉइडमुळे होणार्‍याहोणाऱ्या इतर लक्षणामध्ये यकृत आणि प्लीहेस सूज येणे, प्लीहा फुटणे,रक्तक्षय, रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे, लहान आतड्यामध्ये रक्तस्राराव, सांध्यामध्ये जिवाणूसंसर्ग होतो. सिलक पेशीचा अ‍ॅनिमिया असलेल्या रुग्णामध्ये रक्तक्षय आणि प्रतिकार यंत्रणा क्षीण झाल्याने स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हृदय, मेंदूआवरण आणि मेंदूमध्ये जिवाणू संसर्ग झाल्याने कोमा आणि मृत्यू ओढवतो. उपचार न केल्यास रुग्णास बरे होण्यास कित्येक महिने लागतात.
 
==निदान==
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले