"नाझी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: it:Partito Nazionalsocialista Tedesco dei Lavoratori
No edit summary
ओळ २:
'''राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष''' [[जर्मन भाषा|जर्मन]]: {{ध्वनी-मदतीविना|De-Nationalsozialistische_Deutsche_Arbeiterpartei.ogg|Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei}}), किंवा '''नाझी पक्ष''' हा [[जर्मनी]]मधील [[इ.स. १९२०]] ते [[इ.स. १९४५]] दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] [[वाईमार प्रजासत्ताक|जर्मनीमध्ये]] वाहणार्‍या वर्णद्वेषी व कम्युनिस्टविरोधी चळवळींमध्ये ह्या पक्षाची मुळे रोवली गेली.
 
१९२० साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाची सुत्रे [[अ‍ॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर]]ने १९२१ साली आपल्या हातात घेतली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, [[ज्यूविरोध]] व देशप्रेम भावना ह्यांचे भांडवल करून नाझी पक्ष १९३० सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता. १९३३ साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले. त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकार्‍यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले अथवा ठार मारले. ह्याच वर्षी [[नाझी जर्मनी]]ची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला.
 
हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाने अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यांमध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व वंशाच्या (मुख्यतः [[ज्यू लोक|ज्यू]]) तसेच अपंग, समलिंगी, काळे, मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणार्‍या योजनांचा समावेश होता. ह्याचे रूपांतर [[होलोकॉस्ट]]मध्ये झाले ज्यात सुमारे ६० लाख लोकांची कत्तल करण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाझी_पक्ष" पासून हुडकले