"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २५:
'''नाशिक'''({{ध्वनी|Nashik.ogg|उच्चार}}) अथवा ''नासिक'' [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर [[उत्तर महाराष्ट्र]], [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे.'''
 
 
==इतिहास==
=== प्राचीन इतिहास व पौराणिक संदर्भ ===
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. '''[[पदमानागर]], [[गोदा क्षेत्र ]], [[हरीहर क्षेत्र ]],[[जनस्थान]], [[दक्षिण काशी]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]]''', आणि विद्यमान ''नाशिक'' अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] '''[[नाशिक]]''' परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नसिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीची]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.
 
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिद्ध आहेत. [[इ.स. १२००]] सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत.
ओळ ५८:
* '''निवृत्तीनाथ महाराजची समाधी''' ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथयांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
* [[अंजनेरी]] हे [[हनुमान|हनुमानाचे]] जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
* '''सप्तशृंगीदेवी''' साडेतीन शक्तीपीठ पैकि अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
*''' नारोशंकर घंटा''' हि घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. गंगाघाट, पंचवटी
* [[फाळके स्मारक]] - [[दादासाहेब फाळके]] यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
ओळ ७९:
* '''सादिकशाह हुसेनी बाबा दर्गा शरीफ.'''
* '''बाळ येशू मंदिर''' आशिया खंडातील प्रसिद्ध व पवित्र स्थळ.
* '''टाकेद''' : जटायू-रावण युद्ध या ठिकाणी झाले. येथे रामाने आपल्या बाणाने पाण्याचा झरा निर्माण केला. या परिसराला टाकेद तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.
 
==प्रेक्षणीय स्थळे==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले