"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
==इतिहास==
=== प्राचीन इतिहास व पौराणिक संदर्भ ===
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे.'''[[पदमानागर]], [[गोदा क्षेत्र ]], [[हरीहर क्षेत्र ]],[[जनस्थान]], [[दक्षिण काशी]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]]''', आणि विद्यमान ''नाशिक'' अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] '''[[नाशिक]]''' परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नसिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीची]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.
 
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिद्ध आहेत. [[इ.स. १२००]] सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत.
१३९

संपादने