"जेम्स हॅडली चेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
चेस चा जन्म [[डिसेंबर २४]] [[इ.स. १९०६|१९०६]] रोजी लंडन येथे झाला. चेसचे वडील ब्रिटिश हिंदुस्थानातील सैन्यात कर्नल होते. चेसचे शिक्षण, किंग्ज स्कूल, रोचेस्टर येथे व [[कोलकाता|कलकत्त्याला]] झाले. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने घर सोडले. नंतर त्याने विविध स्वरूपाची कामे केली. कधी पुस्तकाच्या दुकानातला एजंट म्हणून तर कधी बाल विश्वकोशाचा विक्रेता म्हणून त्याने कामं केली. लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी तो पुस्तकांचा घाऊक विक्रेता म्हणून काम करत होता. त्याने एकूण ८० रह्स्यमय कांदबर्या लिहिल्या. १९३३ मध्ये चेस सिल्व्हिया रे हिच्याशी विवाहबध्द झाला. त्याला एक मुलगा होता.
 
दुसऱ्या महायुध्दाच्यामहायुद्धाच्या काळात, चेस रॉयल एअरफोर्स मध्ये दाखल झाला.तेथे त्याने स्क्वाड्र्न लिडर या पदापर्यंत मजल मारली.एअरफोर्स मध्ये जेम्स चेस, डेव्हिड लॅन्ग्डॉनसमवेत आर ए एफ जर्नलचे संपादन करत असे.त्या जर्नल मधील अनेक गोष्टी पुढे "स्लिप्सस्ट्रीम" या पुस्तकात समाविष्ट झाल्या.
 
१९५६ मध्ये चेस फ्रान्समध्ये गेला व तिथून १९६१ पासून तो स्वित्झर्लंड मध्ये जिनेवा सरोवराच्या उत्तरेस असलेल्या कॉर्स्यू विवे (Corseaux-Sur-Vevey) येथे रहात असे.तेथेच त्याचा [[फेब्रुवारी ६]] [[इ.स. १९८५|१९८५]] रोजी मृत्यू झाला.
ओळ ११:
१९२९ ची जागतिक महामंदी, गॅंगस्टर संस्कृती इ.चे सूक्ष्म निरिक्षण व जेम्स एम.केनची "द पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाईस " या कादंबरीचा जेम्स चेसवर परिणाम झाला व त्याने रहस्यात्मक लिखाण करण्याचे ठरवले.चेसने अमेरिकन गॅंगस्टर मा बार्कर व तिच्या मुलांविष्यी वाचले होते;ती माहिती आणि नकाशे व बोलीभाषेतील शब्द घेऊन त्याने सहा आठवड्यात " नो ऑर्किड्स फॉर मिस ब्लॅंडिश" ही कादंबरी लिहिली(१९३९).ह्या कादंबरीला वाखाणण्याजोगी लोकप्रियता तर मिळालीच शिवाय ती त्या दशकाची सर्वात जास्त विकली गेलेली कादंबरी ठरली.त्यावर लंडनच्या वेस्ट एंड नाट्यगृहात १९४८ साली एक नाटक बसवण्यात आले.१९७१ साली रॉबर्ट आल्ड्रिच याने "द ग्रिसम गॅंग"(The Grissom Gang) या नावाने चित्रपट काढला.
 
महायुध्दानंतरमहायुद्धानंतर त्याने एक लघुकथा लिहिली जी गुन्हेगारी वळणाच्या इतर कथांपेक्षा वेगळी होती.तिचे नाव होते " द मिरर इन रूम २२". ही कथा घडते एका जुन्या घरात.त्या घरात एका स्क्वाड्रनचे काही अधिकारी रहात असतात.त्या घराच्या मालकाने आत्मह्त्त्या केलेली आढळून येते व त्याच खोलीत दोन माणसांची गळा चिरून हत्या झालेली असते व त्या प्रत्येकाच्या हातात रेझर असतो.स्क्वाड्रनच्या विंग कमांडरचे म्हणणे असते की तो आरश्यासमोर उभा राहून दाढी करत असताना त्याला आरश्यात एक वेगळाच चेहरा दिसला.त्या चेहर्याने विंग कमांडरच्या गळ्यावर रेझर फिरवला.पण विंग कमांडर वापरत असलेला रेझर नवीन पद्धतीचा असल्यामुळेच तो वाचलेला असतो.ही कथा चेसने त्याच्या खर्या नावाने (रेने ब्रॅबेझोन रेमंड ) १९४६ साली "स्लिप्सस्ट्रीम"मध्ये प्रकाशित केली.
चेसने आपल्या बहुतेक कादंबर्या नकाशे,विश्वकोश,अमेरिकन बोलीभाषेचा शब्द्कोश व अमेरिकन अंडरवर्ल्ड वरील संदर्भग्रंथ यांच्या सहाय्याने लिहिल्या.मायमी व न्यू ऑर्लियन्स मधील थोडा काळ वगळता चेस कधीही अमेरिकेत राहिला नव्हता परंतू त्याच्या बहुतेक कादंबर्यांतील प्रसंग अमेरिकेत घडतात.१९४३ मध्ये गुन्हेगारी जगताविषयी लिहिणाऱ्या रेमंड चॅंडलरने चेसने त्याच्या लिखाणातील मजकूर जसाच्या तसा उचलल्याचा यश़स्वी दावा केला.त्याबद्द्ल चेसला "द बुकसेलर" मध्ये जाहिरजाहीर माफी मागावी लागली.
चेसच्या कथांमधील पात्रं कोणत्याही मार्गाने श्रीमंत कसे होता येईल ह्या विचाराने पछाडलेली असतात.त्याकरता ती निरनिराळे गुन्हे करतात.मग ते विमा पॉलिसीतील अफरातफर असो किंवा चोरी.आणि त्यात त्यांचे बेत फसतात;त्यात खून पडतात व शेवटी त्या कथेतील नायकास समजते की त्याने जे करायला घेतले होतं ते शेवटी त्याच्याच अंगावर शेकणार हे अगदी स्वाभाविकच होते.चेसच्या कथेतील स्त्रिया सुंदर,चलाख,व बेईमान असतात.त्या आपल्या मार्गात येणाऱ्या व आपण केलेला गुन्हा उघडकीस आणणार्यास ठार करण्यास मागेपुढे पहात नाहीत.चेसच्या कथा विघटीत कुटुंबांभोवती रचल्या गेल्या आहेत.कथेचे शीर्षक रहस्याचा शेवट थोडक्यात व्यक्त करणारे असते.