"काळा समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: my:ပင်လယ်နက်
छोNo edit summary
ओळ १२:
काळा समुद्र ही एक बाह्यप्रवाही जलराशी आहे; म्हणजेच, प्रत्येक वर्षी येऊन मिळणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा साधारण ३०० घन कि.मी. इतके जास्त पाणी काळ्या समुद्रातून, बोस्फोरस आणि दार्दनेलस सामुद्रधुनींमार्गे, एजियन समुद्रात जाते.
भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणारे पाणी हे "द्विस्तरीय जलप्रवाह प्रणाली" तयार करते. काळ्या समुद्रातून बाहेर पडणारे जास्त थंड आणि कमी खारट पाणी हे भूमध्य
समुद्रातून काळ्या समुद्रात येणार्‍यायेणाऱ्या पाण्याच्या वर तरंगत राहते, ज्यामुळे पाण्यात खोलवर ऑक्सिजन अभावित पाण्याचा स्तर तयार होतो. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील युरेशियाई जलप्रणालीतील नद्यांतूनही यात पाणी येते, ज्यातील डॉन, नीपर आणि [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत.
 
भूतकाळात पृथ्वीवरील जलपातळी अनेक वेळा कमी जास्त झालेली आहे, की ज्यामुळे, तुलनेने कमी खोल असलेला काळ्या समुद्राचा तळ कधी काळी भूभागही होता. सध्याच्या काळात ही जलपातळी जास्त असल्यामुळे, सध्यातरी काळा समुद्र हा मुख्य सागरप्रणालीशी तुर्की सामुद्रधुनी तसेच भूमध्य समुद्रामार्गे जोडलेला आहे. जलपातळी कमी/जास्त होत असता, तुर्की सामुद्रधुन्या हा काळ्या समुद्राचा मुख्य जलनिचर्‍याचा मार्ग आहे. ज्या ज्या काळात काळ्या समुद्राला मुख्य सागर प्रणालीशी जोडणारे जलप्रवाह अस्तित्त्वात नसतात, त्या त्या वेळी, काळा समुद्र हा एक मोठे सरोवर असल्याप्रमाणे असतो. तुर्की सामुद्रधुनीत बोस्फोरस, मार्माराचा समुद्र आणि दार्दनेलस या जलराशींचा समवेश होतो.