"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १४:
[[इ.स.चे ६ वे शतक]] ते [[इ.स.चे ८ वे शतक]] भारतातील राजकीय इतिहासाचा प्रमुख रोख पल्लव व बदामीचे चालुक्य यांच्यात श्रेष्ठत्वासाठी चाललेल्या झगड्याभोवती केंद्रीत होता. [[कृष्णा नदी|कृष्णा]] व [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रा]] या दोन नद्यांमधील प्रदेशावर प्रभुत्व मिळविण्यासाठी दोन्हीही सत्तांचे प्रयत्न चालू असत. पल्लव राजांनी अनेक वेळा तुंगभद्रा नदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष कधी एकाला तर कधी दुसर्याला विजय मिळवून देत दीर्घकाळ चालू राहिला.
 
दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षातील महत्त्वाची घटना चालुक्य नरेश दुसरा पुलकेशी याच्या काळात घडली. त्याने कदंबांची राजधानी बाणावसी आपल्या अमलाखाली आणली व [[म्हैसूरचे राज्य|म्हैसूरच्या]] गंग राजांना आपल्या अधिराज्यत्वाला मान्यता देण्यास भाग पाडले. या संघर्षातदुसरा पुलकेशी जवळजवळ पल्लवांच्या राजधानीपर्यंत पोहोचला होता पण पल्लवांनी त्यांचे उत्तरेकडिल प्रांत पुलकेशीला देऊन टाकले. हाच प्रदेश वेंगी नावाने ओळखला जातो. चालुक्यांनी आपल्या घराण्याची एक शाखा येथे स्थापन केली तीच शाखा वेंगीचे पूर्वेकडील चालुक्य म्हणून ओळखली जाऊ लागलीजाते.
 
पल्लवांच्या प्रदेशावर दुसर्या पुलकेशीने केलेले दुसरे आक्रमण मात्र अयशस्वी ठरले. या आक्रमणावेळी पल्लव राजा नरसिंहवर्मन याने [[इ.स. ६४२]] च्या सुमारास वातापी ही चालुक्यांची राजधानी ताब्यात घेतली. याचवेळी दुसरा पुलकेशीही मारला गेला. इ.स.च्या ७ व्या शतकाच्या अखेरीस पल्लव व चालुक््यचालुक्य यांच्यातील संघर्ष काहिसा थंडावला. इ.स.च्या ८ व्या शतकाच्या पूर्वार्धात चालुक्य राजा दुसरा विक्रमादित्याने तीनवेळा [[कांची]]वर हल्ला करून कांची जिंकण्याचा प्रयत्न केला. [[इ.स. ७४०]] मध्ये विक्रमादित्याने पल्लवांचा अतिशय दारूण पराभव केला. चालुक्यांकडून झालेल्या या पराभवानंतरही शंभर वर्षे पल्लव राज्यकर्ते तग धरून राहिले असले तरी चालुक्यांच्या या विजयामुळे पल्लवांची अतिदक्षिणेकडील श्रेष्ठता मात्र पूणपणे संपुष्टात आली.
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पल्लव_वंश" पासून हुडकले