"अ‍ॅडेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
नवीन ग्रॅमी
छो (r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: be:Адэль, спявачка)
(नवीन ग्रॅमी)
'''अ‍ॅडेल लॉरी ब्लू अ‍ॅडकिन्स''' <ref name=nicole>Frehsée, Nicole (22&nbsp;January&nbsp;2009), "Meet Adele, the U.K.'s Newest Soul Star", ''Rolling Stone''. (1070):26</ref> (जन्म: [[५ मे]], [[इ.स. १९८८|१९८८]]), ही अ‍ॅडेल या एकेरी नावाने सुप्रसिद्ध असलेली, इंग्रजी गायिका आणि कवयित्री आहे. एका मित्राने २००६ मध्ये [[मायस्पेस]]वर तिची गाणी टाकल्यानंतर अ‍ॅडेलला एक्स्एल रेकॉर्डिंग्जतर्फे गाणी ध्वनिमुद्रित करण्याचे कंत्राट मिळाले. त्याच्या पुढच्याच वर्षी तिला [[ब्रिट अवॉर्ड्‌ज]]मधील समीक्षकांचा पुरस्कार आणि [[बीबीसी]]([[साउंड ऑफ २००८]]) हा पुरस्कार मिळाला. तिचा पहिला अल्बम [[19 (अल्बम)|19]] [[इ.स. २००८|२००८]] मध्ये बाहेर पडला, त्याला मोठे यश मिळाले. त्या अल्बमला यू.के.मध्ये ४ पट प्लॅटिनम विक्रीचा दाखला मिळाला<ref name="BPI certifications">{{cite web |दुवा=http://www.bpi.co.uk/certifiedawards/search.aspx|शीर्षक=Certified Awards Search |publisher=[[British Phonographic Industry]]|accessdate=2011-03-01}}</ref>. तिने [[सॅटरडे नाइट लाइव्ह]] या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर तिच्या अमेरिकेतील कारकिर्दीला [[इ.स. २००८|२००८]]च्या उत्तरार्धात जोर मिळाला. अ‍ॅडेलने तिचा दुसरा अल्बम [[21 (अल्बम)|21]] [[इ.स. २०११|२०११]] मध्ये बाजारात आणला. त्याला दोन्ही समीक्षकांकडून आणि शिवाय बाजारात चांगल्या रीतीने स्वीकारले गेले, आणि या आल्बममध्ये तिला तिच्या पहिल्या अल्बमपेक्षाही जास्त यश मिळाले. 21 या अल्बमला यू.के.मध्ये १४ पट प्लॅटिनम विक्री झाल्याचा दाखला मिळाला. <ref name="BPI certifications"/>, हा आल्बम अमेरिकेत १९९८ नंतरच्या इतर कोणत्याही अल्बमपेक्षा जास्त दिवस पहिल्या स्थानावर राहिला होता. <ref>{{cite news|शीर्षक=Adele's "21" regains top spot on Billboard chart|url=http://www.reuters.com/article/2011/10/26/us-adele-charts-idUSTRE79P6HM20111026|work=[[Reuters]]|date=26 October 2011|accessdate=2011-10-28}}</ref><ref>{{cite news|first=Keith|last=Caulfield|शीर्षक=Adele Back at No. 1|दुवा=http://www.billboard.com/news/casting-crowns-scores-top-billboard-200-1005437632.story#/news/casting-crowns-scores-top-billboard-200-1005437632.story|work=[[Billboard (magazine)|Billboard]]|date=26 October 2011|accessdate=2011-10-28}}</ref>
 
21 या अल्बमच्या यशामुळे अ‍ॅडेलची [[गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌ज]]मध्ये विविध विक्रमांसाठी नोंद करण्यात आली. ती यू.के.मध्ये एका वर्षात अल्बमच्या३० लाखांपेक्षा जास्त प्रती विकणारी पहिली कलाकार बनली<ref name=guinness>{{cite web|last=Kaufman|first=Gil|शीर्षक=Adele, Lady Gaga, Justin Bieber Land New Guinness Records|दुवा=http://www.mtv.com/news/articles/1670701/lady-gaga-adele-guinness-book-of-world-records.jhtml|work=MTV|accessdate=23 September 2011|date=14 September 2011}}</ref>. [[इ.स. १९६४|१९६४]] मधील [[बीटल्स]]नंतर पहिल्यांदाच कुणीतरी एकाचवेळी यू.के. ऑफिशियल सिंगल्स चार्ट आणि ऑफिशियल अल्बम चार्ट यांमध्ये पहिल्या पाच स्थानांतील दोन जागा पटकवण्याची कामगिरी केली आहे. अ‍ॅडेलला २०११ मध्ये दोन आणि २०१२ मध्ये सहा [[ग्रॅमी पुरस्कार]] मिळाले आहेत<ref name=beats>[http://www.dailymail.co.uk/tvshowbiz/article-1358907/Adele-beats-Lady-Gaga-No-1-matches-The-Beatles.html "Adele beats Lady Gaga to No 1… and matches Beatles for two top five singles and two top five albums in the same week"], [[Daily Mail]] (UK), Retrieved 2011-02-21</ref><ref>[http://www.mtv.co.uk/artists/adele/news/259080-adele-number-1-single-album-someone-like-you-brits "Adele's 'Someone Like You' Tops UK Singles Chart"], MTV, Retrieved 2011-02-21</ref> <ref>[http://www.esakal.com/esakal/20120214/4664751202047395004.htm "ब्रिटनची गायिका एडेलेला सहा ग्रॅमी पुरस्कार"], सकाळ, १४-०२-२०१२ ला पाहिले.</ref>.
==संदर्भ==
३,१४५

संपादने