"बाळाजी विश्वनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४२:
'''बाळाजी विश्वनाथ भट''' ( [[इ.स. १६६०]] – [[एप्रिल २]], [[इ.स. १७२०|१७२०]]), किंवा '''पेशवे बाळाजी विश्वनाथ''' हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.
 
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालु होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात तर रीयासतकार १४७८ च्या सुमारास ही देशमुखी मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवछत्रपतींच्या सेवेत असावेत असेहिअसेही रीयासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजी या परंपरागत देशमुखीवर होता. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाऊ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खूनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडून मारला गेला. स्वामीनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती.
 
==बाळाजी विश्वनाथाची सुरवातीच्या काळातील उमेदवारी==
ओळ १२२:
 
मात्र राघोबादादाची पाठ फिरताच दिल्लीतील शहा, अहमदशहा अब्दालीशी चुंबाचुंबी करू लागला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊ(चिमाजी अप्पाचा पुत्र) शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे असे तोलामोलाचे सरदार घेउन जाट व रजपुतांच्या मदतीने दिल्लीवर चालुन गेला. दिल्ली ताब्यात येताच त्याने विश्वासरावाला आपल्या पुतण्याला सिंहासनावर बसवण्याचे ठरवले. मात्र उद्या हिंदु राजा बसवुन भाऊ निघुन जाईल, पण अफगाणांनी चिडुन आक्रमण केले तर उत्तरेतिल सगळी राज्ये त्या खाली भरडली जातिल ही भीती जाट-शिख-रजपुतांना वाटली, त्यांनी या गोष्टीला नकार दिला. मात्र मराठ्यांची दहशत रहावी म्हणून सदशिवरावभाऊने घणाचे घाव घालुन दिल्लीचे तख्त फोडले.
पण जाट-रजपुतांची भीती खरी ठरली. राघोबाने डिवचलेला अब्दाली संधीची वाटच बघत होता. मराठ्यांनी दिल्लीवर आक्रमण करताच दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणून त्याने मोर्चा बांधणी चालु केली. १७ ऑक्टोबर १७६० रोजी त्याने दिल्लीच्या दिशेने कुच केले. अगदि २४-२५ तारखेपर्यंत तो भागपतपर्यंत आला. मराठी सैन्य या वेळी धान्याच्या चणचणी मुळे कुंजपुराकडे वळली होती. मराठी सैन्याने अब्दालीने यमुना ओलांडु नये म्हणून फारसे काही प्रयत्न केले नाहीत. आधीच आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच प्रभावाखाली असलेल्या भूमीवर अब्दालीला अंगावर घेऊ असा विचार भाऊने केला. हे अब्दालीच्या पथ्यावरच पडले, त्याचे सैन्य अगदी सोनपत आणि पानिपत नजीक येउन ठेपले. भाऊला त्या भागाची फारशी माहीतीमाहिती नव्हती, उत्तरेतिल त्याची पहीलीच मोहीम होती. सुरुवातिला छोट्या-छोट्या चकमकीत मराठी सैन्याने हिसका दाखवला असला तरी अनुभवी अब्दालीच्या सैन्याने १४ जानेवारी १७६१ रोजी मुख्य लढाईला तोंड फ़ोडले. या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत दोहो बाजुचे मोठे नुकसान झाले.
 
यात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. लाखापेक्षा पेक्षा जास्त मराठी सैन्य कापले गेले. १८ वर्षांचा कोवळा विश्वासराव लढाईत मारला गेला. सदशिवरावभाऊ देखिल कामी आला. दोघांची प्रेते अफगाणी सैनिकांच्या हाती लागली. कोवळ्या विश्वासरावाचे प्रेत बघून तर अब्दाली चाटच पडला "सुभान अल्लाह, क्या नुर है? मरनेके बाद इतना हसीन है तो जिंदा कैसा होगा?" अश्या आशयाचे उद्गार त्याच्या तोंडुन निघाले. म्हणूनच अब्दाली विश्वासरावाच्या प्रेताला आपल्या बरोबर घेऊन जाणार होता असे म्हणतात. ब्रिटिश पत्रे देखिल विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात. असे समजतात की पानिपतच्या लढाई नंतर पुणे भागातील एकही घर असे नव्हते की ज्या घरातला पुरुष कामी आला नव्हता पेशवाईची पत्रे याचा उल्लेख घरोघरी बांगड्या फुटल्या असे करतात. नानासाहेबाला जे पत्र आले त्यात लिहीले होते "दोन ही्रे हरवले, काही मोती हरवले आणि मोहोरा किती हरवल्या याला गणानाच नाही". पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला खरा पण मराठ्यांनी अब्दालीला देखिल असा फटकावला की त्या नंतर दिल्लीकडे परत तो कधीच फिरकला नाही. आजही तेथील माणसे जिंकलेल्या अब्दालीपेक्षा हरलेल्या मराठ्यांना मान देतात, भाऊने जेथुन लढाईची सुरुवात बघितली होती तिथे हरीयाणा सरकारने एक स्मृतीस्तंभ उभा केलाय. मात्र पानिपतचा पराभव मराठ्यांच्या सत्तेवरचा मर्मप्रहार ठरला. त्यानंतर मराठी सत्ता परत पुर्वीच्या तडफेने कधीच उठली नाही. मराठ्यांचा प्रभाव हळुहळु कमी होत गेला.