"इयान फ्लेमिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: is:Ian Fleming
छोNo edit summary
ओळ ३:
“धिस इज बाँड... जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग, आणि मग सुरु होतो खेळ विध्वंसाचा. विध्वंस इमारतींचा, गाड्यांचा, विमानांचा, आणि हृदयांचा देखील. जेम्स बाँड म्हणतो, “विधायक कामांशी माझं फार सख्य नाही.” बरोबरच आहे ते. हत्येचा परवाना घेऊन फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे जेम्स बाँड! त्याला 'सुपरहिरो' म्हणणं अतिशयोक्ती ठरेल. आणि कोणत्याही बाँड-चाहत्याला, जेम्स बाँड हे एका लेखकानं निर्माण केलेलं काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडणार नाही. हेच सत्य असलं तरी.
 
जेम्स बाँड या स्वप्नवत नायकाच्या निर्मितीमागील अफलातून मेंदू आहे, [http://aisiakshare.blogspot.com/2010/03/blog-post_26.html इयान फ्लेमिंग] यांचा. चला तर मग, बाँड थरारांच्या या लेखकाबद्दल अजून जाणून घेऊ. इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८ मध्ये झाला. सुरुवातीचं शिक्षण इटॉन इथं झालं. सॅँडहर्स्ट इथं काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्यानं, १९३१ ला ते रुचर्स न्यूज एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकाचा पीए म्हणून काम केलं, जिथं त्यांचा हुद्दा लेफ्टनंट वरुन कमांडर पर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळालंमिळाले.
 
युद्धानंतर फ्लेमिंग, केम्सली न्यूजपेपर्स मध्ये परराष्ट्र व्यवस्थापक बनले. त्यांनी जमैकामध्ये आपलं घर, 'गोल्डनएज' बांधलं. इथंच, १९५३ मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी जेम्स बाँड कादंबर्‍यांतील पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झालं; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बाँड कादंबर्‍यांच्या ४० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि अशाप्रकारे जेम्स बाँड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झालं.