"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६०:
[[इ.स. १८९८]] साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. काळाने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत ‘केसरी’लाही मागे टाकले असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांमध्ये केली होती. ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात असत. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. ‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला. [[विष्णुशास्त्री चिपळूकर]] शिवरामपंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांचा शिवरामपंतांवरील प्रभाव लेखनातून ठळकपणे जाणवतो.
 
‘काळ’ वृत्तपत्राची सुरुवात करण्यापूर्वी शिवरामपंतांनी काही काळ [[लोकमान्य टिळक]] यांच्या समवेत सार्वजनिक कार्य केले. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातूनही त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. [[इ.स. १९०८]] साली त्यांना ‘काळ’मधील लिखाणासाठी ब्रिटिशांकरवीभारतातील इंग्रज सरकारने अटक झालीकेली आणि त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. [[इ.स. १९०९]] पर्यंत ‘काळ’ चालू होता. त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने मागणी केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या जात-मुचलक्याची (जामिनाची) पूर्तता करणे शक्य न झाल्याने ‘काळ’ बंद पडला. पुढे [[इ.स. १९२०]] साली त्यांनीशि.म.परांजपे यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले.
 
पुढे [[इ.स. १९२२]] मध्ये त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच त्यांनी ग्रंथलेखनही केले. ‘विंध्याचल’, ‘संगीत कादंबरी’, ‘मराठ्यांच्या लढ्याच्या इतिहास’, ‘रामायणाविषयी काही विचार’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. [[इ.स. १९२९]] मध्ये बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. परांजपे यांच्या ‘काळ’ या वृत्तपत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात ‘केसरी’च्या बरोबरीने प्रेरक भूमिका बजावली, तसेच त्यांच्या लेखनाने पत्रकारिता व मराठी साहित्यातही मौल्यवान भर घातली.
 
== प्रकाशित साहित्य ==