"आर्थर मिलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
 
==जीवन==
[[इ.स. १९१५]]मध्ये न्यू यॉर्क शहरातील हार्लेम विभागात आर्थर मिलराचा जन्म झाला. इसिदोर आणि ऑगस्टा मिलर या दांपत्याच्या तीन मुलांपैकी आर्थर हा दुसरा मुलगा होय. त्याचे वडील हे अशिक्षित परंतु बर्‍यापैकीबऱ्यापैकी श्रीमंत व्यापारी होते. त्यांचे स्त्रियांच्या कपड्यांचे दुकान होते. [[इ.स. १९२९]]च्या वॉल स्ट्रीट मंदीमध्ये मिलर कुटुंबाची जवळपास सर्व मालमत्ता गेली. घरखर्चाला मदत म्हणून मिलर घरोघरी पाव वाटण्याचे काम करत असे. [[इ.स. १९३२]]साली अब्राहम लिंकन हायस्कुलातील शिक्षण पूर्ण केल्यावर कॉलेज फीसाठी त्याने बरीच छोटीमोठी कामे केली.
 
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे, मिलराने पत्रकारिता विषयात प्रावीण्य संपादन केले. 'द मिशिगन डेली' या विद्यार्थ्यांकडून चालवल्या जाणार्‍या वृत्तपत्रात त्याने वार्ताहर आणि रात्रपाळीचा संपादक म्हणून कामही केले. याच काळात त्याने आपले पहिले नाटक 'नो व्हिलन' लिहून काढले. मिलराने नंतर इंग्लिश हा मुख्य विषय घेऊन 'नो व्हिलन' या नाटकासाठी अवेरी हॉपवुड पारितोषिक मिळवले. या पारितोषिकाने त्याच्या नाटककार बनण्याच्या विचाराला चालना दिली. केनेथ रो या प्रसिद्ध प्राध्यापकांच्या नाट्यलेखन कार्यशाळेत तो सहभागी झाला. रो यांनी मिलराला नाटके लिहिण्याच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन केले. [[इ.स. १९३७]]मध्ये मिलराने 'ऑनर्स अ‍ॅट डॉन' हे नाटक लिहिले. या नाटकालादेखील अवेरी हॉपवुड पारितोषिक मिळाले.