"व्हिन्सेंट व्हॅन घो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: os:Ван Гог, Винсент
छोNo edit summary
ओळ ५२:
ज्या आवेगाने त्याने इव्हांजेलिस्टपणात स्वतःला झोकून दिले होते, त्याच आवेगाने त्याने कलावंतपणात उडी घेतली. बरेच महिने त्याचे आनंदात गेले आणि त्याचा हात सुधारत गेला. पण पाचवीलाच पुजलेली अस्थिरता पन्हा रोंरावत आली. प्रेमभंगाचे एक प्रकरण त्याला हादरे देऊन गेले. त्यात वडिलांशी धर्मविचारांवर झालेले मतभेद एवढे पराकोटीला पोहोचले, की व्हिन्सेंट बापाचे घर त्यागून पुन्हा बाहेर पडला. 1881च्या ख्रिसमसला तो हेगकडे निघाला ते वडिलांशी संबंध विच्छेदूनच.
 
पण पोटभरणीचं काय ? त्याचा धाकटा भाऊ थिओ त्याच्या मदतीस आला. थिओला भावाची फार कदर होती. त्याने आपल्या उत्पन्नातून ठराविकठरावीक रक्कम व्हिन्सेंटला पोहोच करण्याचे काम व्रत म्हणून आयुष्यभर स्वीकारले. व्हिन्सेंटचा मित्रसमान मातुल नातलग अंतोन मुऑव्ह याने व्हिन्सेंटला उत्तेजन दिले, त्याची कला बहरेल असे वातावरण निर्मिले. पण परत व्हिन्सेंटचा स्वभाव आडवा आला. त्यांची मैत्री भंगली. परिस्थितीचा उग्र वैशाख वणवा त्याला आयुष्यभर चटके देत होताच. बंड म्हणून की काय, पण समाजात त्याज्य अशा एका वेश्येसोबत व्हिन्सेंट राहू लागला. या क्रूर नियतीहून मी स्वतः माझी बरबादी अधिक करू शकतो हेच तो जणू सिद्ध करू पहात होता. त्याने या आपल्या मैत्रिणीवर अन् सोबतच्या तिच्या अनौरस मुलावर प्रेमाचा अन् मायेचा वर्षाव सुरू केला. तिच्याशी रीतसर विवाहाचा विचार केवळ थिओच्या मनधरणीमुळेच त्याने बाजूस सारला. एकीकडून नियतीचे तर दुसरीकडून स्वतःच्या निसर्गदत्त स्वभावाचे फटके खात त्याचं आयुष्य होलपाटत चाललं होतं.
 
1884 मध्ये अखेर तो पुन्हा आपल्या पैतृक घराकडे परतला. त्याच्या मातापित्यांनी या वाट चुकल्या कोकराचं स्वागत केलं. त्यानं त्या परिसरातल्या शेतकऱ्याकामकऱ्यांचं आयुष्य चित्रांत पकडायला सुरूवात केली. त्याचं “ द पोटॅटो ईटर्स “ हे चित्र याच काळातलं.