"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ८०:
 
“ अनुबंध आणि अनुबंध कार्य”
चेतापेशी अक्षरश: शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक अॅ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठराविकठरावीक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते.
डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे.
अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लॉंग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत.
ओळ ८८:
चेता संस्थेचे मूळ कार्य चेतापेशीकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि परस्पर संबंध प्रस्थापित करणे. चेतापेशींच्या परस्पर संबंधामुळे चेतापेशी अनेक विस्तृत कामे करू शकतात. त्यामध्ये अभिज्ञान (डिटेक्शन) ,आकृतिबंध बनविणे ( पॅटर्न जनरेशन) , आणि काळाचे भान अशाचा समावेश होतो. चेतापेशींच्या नेमक्या कामाचा आढावा ही मोठी कठीण बाब आहे. कारण अनेक पेशी एकाच वेळी अनेक कार्याशी संबंधित असतात. आजच्या प्रगत संशोधनाने सुद्धा परस्पर संबंधी चेता पेशी काय करीत असतात याची पुसटशी कल्पना गणिताच्या सहाय्याने करण्यात अपयश आले आहे.
शास्त्राच्या इतिहासात चेतासंस्थेचे प्रमुख कार्य संवेद आणि प्रतिसाद देणारी यंत्रणा असे आहे. या अनुषंगाने संवेदी चेता पेशीमध्ये संवेदापासून पेशीचे कार्य सुरू होते. साखळी पद्धतीने संवेद एकापाठोपाठ दुसऱ्या चेतापेशीकडून मेंदूकडे पाठविले जाते. मेंदूकडून आज्ञापेशीकडे पाठविलेला आवेग स्नायूकडे आल्यानंतर प्रतिक्रिया पूर्ण होते. देकार्त या शात्रज्ञास प्राण्यांचे आणि मानवी वर्तन संवेद प्रतिसाद यंत्रणेने स्पष्ट होईल असे वाटत होते. पण उच्च बोधीय (कॉग्निटिव्ह) वर्तनाचे उदाहरणार्थ भाषेचा वापर, प्रेरणा, अमूर्त कल्पना यांचे स्पष्टीकरण केवळ संवेद प्रतिसाद या पद्धतीने देता येईल असे त्यास वाटत नव्हते. 1906 साली चार्लस शेरिंग्टन याने लिहिलेल्या “इंटिग्रेटेड अॅतक्शन ऑफ नर्व्हस सिस्टीम” या पुस्तकामध्ये संवेद प्रतिसाद यंत्रणेवर विस्तृत विवेचन केलेले आहे. विसाव्या शतकात मानसशास्त्रज्ञानी वर्तन हे चेतासंस्थेचे प्रमुख कार्य मानल्याने संवेद प्रतिसाद प्रक्रियेने मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला.
विद्युत शरीररचना शास्त्र, या नव्या शाखेच्या विसाव्या शतकातील अभ्यासानंतर 1940 मध्ये चेतासंस्थेमध्ये उपजत संरचना (पॅटर्न) बनविण्याची यंत्रणा असते. या संरचना बनविण्यासाठी बाह्य संवेदाची गरज नसते असे समजले. चेतापेशी ठराविकठरावीक वेळाने संवेद किंवा संवेद समूह आपोआप पाठवितात हे कळले. चेतापेशी पूर्णपणे वेगळी केली तरी हे चालूच राहते. चेतापेशी परस्पराशी जोडल्या गेल्यानंतर ही यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची कामे करू लागते. सध्याच्या आधुनिक सिध्द्धांताप्रमाणे चेतासंस्थेचे कार्य संवेद प्रतिसाद साखळ्या आणि उपजत आवेग संरचनेच्या तयार होण्याने नियंत्रित होतात आणि प्राण्याचे वर्तन याच्या समुच्चयाने होते असे सिद्धझाले आहे.
 
== प्रतिक्षेपी क्रिया ==
सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठराविकठरावीक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात.
 
संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “अॅ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो.