"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
ओळ ९:
=== समुद्री कासव ===
समुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती [[भारत|भारताच्या]] [[समुद्र किनारा|समुद्री किनार्‍यावर]] आढळून येतात.
* '''ऑलिव्ह रिडले कासव''' - हे प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारतात [[ओडिशा|ओडिशा]]च्या [[गोहिरमाथा]] समुद्र-किनार्‍यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कासवे भारताच्या इतर किनार्‍यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. [[कोकण]] किनार्‍यावरही ही कासवे आढळून येतात.
* '''हिरवे कासव''' (ग्रीन टर्टल) - या कासवाचे पोट गुळगुळीत असते तर पाठ अतिशय टणक असते. पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. या कासवांच्या शरीराच्या मानाने डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर यांचा आढळ आहे.
* '''चोच कासव''' - (हॉक्स बिल टर्टल) या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो. त्यामुळे त्यांना चोच कासव म्हणतात. ही छोट्या आकाराची कासवांची जात आहे. आपली घरटी ही कासवे एकान्त असलेल्या ठिकाणी बांधणे पसंत करतात. [[स्पंज]], [[माखले]], [[झिंगे]] हे त्यांचे खाद्य असते. भारतात यांचा आढळ [[अंदमान आणि निकोबार]], [[निकोबार]] आणि [[लक्षद्वीप]] बेटांवर आहे.
ओळ ४४:
[[वर्ग:जलचर प्राणी]]
[[वर्ग:स्थलचर प्राणी]]
[[वर्ग:सरीस्रुपसरीसृप]]
 
[[an:Testudines]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कासव" पासून हुडकले