"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०:
पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाचा उपयोग करून अद्भुत असा [[परीस]] हॉग्वार्ट्झमधुन चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणुन पाडतो.
 
दुसर्‍यादुसऱ्या भागात [[टॉम रिडलची डायरी]] रॉनची बहीण [[जिनी विजली]]ला पछाडते व तिच्याकरवे [[गुप्त चेंबर]] उघडविते. त्या चेंबरमध्ये असलेला [[बासिलिक सर्प]] हॉग्वार्ट्झमधील [[मगल]] विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी परत एकदा रॉनच्या सहाय्याने [[ग्रिफिंडोरची तलवार]] वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बासिलिक सर्पाचा सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
 
तिसर्‍या भागात हॅरीला कळते की [[सिरियस ब्लॅक]] नावाचा कैदी [[अझकाबान]] नावाच्या तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्या निमित्ताने हॉग्वार्ट्झला [[पिशाच्च|पिशाच्च्यांची]] सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझकाबानचे रक्षक असतात. पिशाच्चांच्या अवतीभवती येण्यार्‍या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी ते शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉग्वार्ट्झमध्ये [[काळ्या जादुविरुद्ध बचाव]] हा विषय शिकविण्यासाठी [[रिमस ल्युपिन]] नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की त्याला पिशाच्चांच्या शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन [[पॅट्रोनस मंत्र]] शिकून घेतो व आत्मसात करतो, जे आजवर भल्याभल्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते. शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र [[पीटर पॅटिग्र्यु]]ने हॅरीच्या वडीलांबद्दल विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वॉल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सगळे खापर सिरियसवर फोडलेले असते व जगाच्या लेखी त्याला वीरमरण आलेले असते. हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला पिशाच्चांच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन [[हिंस्र लांडगा|हिंस्र लांडग्यामध्ये]] परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले