"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,०७२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
 
जयभीम, संकल्प द्रविड तुम्ही''' धोका घडी केली आहे'''. तुम्ही एकीकडे माझ्या चर्चा पानावर बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी आपणास आस्था असल्याचे गोड गोड बोलता आणि भीमपिडियाला टाळता ? येथील कार्यक्रम हे आपल्या पूर्वनियोजित मर्जी प्रमाणे आपण करीत आहात. सदस्यांच्या मर्जीचा आपण विचार केलेला नाही. आनंदरावांनी म्हटल्या प्रमाणे आपण आणि अभय नातू ह्यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच '''नैतिक अधिकार नाही.''' आपण लोक''' राजकारणच खेळत आहात ''' यात वाद नाही. [[सदस्य:Meshram|Meshram]] १८:५४, २३ जानेवारी २०१२ (UTC)
 
==मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा प्रस्ताव==
[[विकिपीडिया:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा]] :
 
विक्शनरी, विकिस्रोत या प्रकल्पात प्रताधिकार मुक्तीचा प्रश्न नसेलतर साधारणत: कमीत कमी अडथळ्यांनी वेगाने टायपिंग करता येऊ शकते त्या दृष्टीने मराठी विकिपीडियाचे बंधूप्रकल्प विक्शनरी, विकिस्रोत मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा घेणे प्रस्तावित आहे.या स्पर्धेचे स्वरूप कसे ठेवता येईल व संबधीत प्रकल्पांच्या मुलभूत संकल्पनांशी तडजोड नकरता मराठी भाषेच्या विकासात रचनात्मक काम करणार्‍या संस्थांना युनिकोडस्पर्धेत कशा रितीने सहभागी करून घेता येईल या संबंधाने हा चर्चा प्रस्ताव आहे.
अशाच पद्धतीने मराठी विकिपीडिया,विकिस्रोत,विकिबुक्स,कॉमन्स, ट्रांसलेट विकि, इत्यादी करीता भाषांतर स्पर्धा सुद्धा कशा भरवता येतील या संबधाने सुद्धा चर्चेचे स्वागत आहे. [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०५:५३, २४ जानेवारी २०१२ (UTC)
३३,१२७

संपादने