"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६३:
 
या बाबत आपली मते कळवावीत त्याप्रमाणे प्रोजेक्ट करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्य सिद्धीस नेता येईल. J यांनी यावर त्यांच्याकडून आजच काम सुरु केलेले दिसले.....मंदार कुलकर्णी १२:५०, २२ जानेवारी २०१२ (UTC)
 
== मराठी भाषा दिवसानिमित्त संपादनेथॉन ==
 
नमस्कार मंडळी!
 
दरवर्षी [[२७ फेब्रुवारी]]ला जगभर पाळल्या जाणार्‍या [[मराठी भाषा दिवस|मराठी भाषा दिवसानिमित्त]] त्याआधीच्या सप्ताहांतास - म्हणजे शनिवार २५ फेब्रुवारी व रविवार २६ फेब्रुवारीस - मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात ''[[विकिपीडिया:संपादनेथॉन|संपादनेथॉन]]'' - आयोजित करावी असा प्रस्ताव मी मांडत आहे. या संपादनेथॉनेत आपण एका दिवसात मराठी विकिपीडियावर शक्य तितकी संपादने करायची व यातून एका दिवसात आपण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीला आपल्या सर्व ताकदीनिशी शक्य तितका '''मोठ्ठा रेटा''' द्यायचा हा मुख्य हेतू आहे. आपण या संपादनेथॉनेत कोणकोणत्या कार्यक्रम आराखड्यांनुसार संपादने करू शकतो याबद्दल '''<big>[[विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २]]</big>''' येथे प्रस्ताव मांडावेत.
 
या दिवशी आपण मोठ्ठा रेटा देऊन दिवसभरात घडलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून आपल्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करू शकतो. त्यावरून आपल्याला पुढील वाटचालीसाठी काही मोलाची माहिती उपलब्ध होऊ शकेलच; पण त्याचबरोबर आपण विविध ऑनलाइन व छापील माध्यमांमधून याबद्दल वार्तांकन घडवून आणून मराठी विकिपीडिया प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी हा उपक्रम वापरू शकू.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १३:५४, २३ जानेवारी २०१२ (UTC)