"किशोर कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३२:
 
==बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ==
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. [[बोंम्बे टॉकीज]] मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ. स. १९४६) होता. या चित्रपटात [[अशोक कुमार]] यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार [[खेमचंद प्रकाश]] यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ. स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएं क्यों मांगू". यानंतर किशोर कुमार यांना बरेच गाण्याच्या संधी मिळाल्या. इ. स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.
बॉंम्बे टॉकीजच्या व [[फनी मजूमदार]] दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
 
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते [[के.एल्. सैगल]] यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार [[सचिन देव बर्मन]] यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
 
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. [[बिमल रॉय]] बरोबर "नौकरी" (इ. स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). [[सलिल चौधरी]], "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोर चे गाणे ऐकून, त्यांनी [[हेमंत कुमार मुखोपाध्याय|हेमंत कुमार]] च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
 
==कारकीर्द==