"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०:
 
मराठे व अब्दाली यांच्यात इ.स. १७६१ पानिपतचे युद्ध झाले असले तरी हिंदुस्थानला अब्दालीचा हा पहिलाच परिचय होता असे नाही. या आधीही त्याने भारतावर चार स्वार्‍या केलेल्या होत्या.<br />
इ. स. १७४७ मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा नादीरशहाचा खून झाला. त्यामुळे त्याचा सेनापती अहमदशहा अब्दालीने सत्ता बळकावली. सत्तेवर येताच त्याने हिंदुस्थानातील राजकिय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवरी १७४८ मध्ये हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाजखानाचा पराभव करून दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने (महमदशहा) त्याच्याविरूद्ध आपला मुलगा अहमदशहा वजीर कमरूद्दीन व मीरबक्षी सफदरजंग यांना पाठविले. २१ मार्च रोजी मनुपूर तेथे लढाई होऊन अब्दालीचा पराभव झाला पण वजीर कमरूद्दीन मारला गेला.
 
अब्दालीचा पराभव झाला असला तरी तो नष्ट झाला नव्हता. त्याने इ.स. १७४९ मध्ये दुसरी स्वारी केली. पंजाबचा सुभेदार मीरमन्नुने वजीरबादजवळ अब्दालीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीहून मदत न मिळाल्याने त्याने अब्दालीशी तह केला. त्यानुसार अब्दालीला पंजाबच्या उत्तरेकडील चार जिल्हे व १ लाख रूपये खंडणी मिळाली.