"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुनर्लेखन
छोNo edit summary
ओळ ३७:
==इतिहास ==
[[चित्र:Bangalore Palace.jpg|thumb|250px|१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला ]]
बेंगळूरूचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या काळात [[चोळ साम्राज्य|चोळ साम्राज्यात]] हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसाळ, [[विजयनगर साम्राज्य]] इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. खरी सुरुवात इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिर बांधून केली. दुसर्‍या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. इ.स. १६३८ साली [[रणदुल्ला खान]] आणि [[शहाजीराजे भोसले]] यांनी तिसर्‍या केंपेगौडास हरवून बंगळूर [[आदिलशाही]] मुलखास जोडले. शहाजीराजांना बंगळूर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिकपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासिम खानाने [[मुघल साम्राज्य|मुघलांचे]] सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र ''व्यंकोजी भोसले'' याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासिम खानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख [[म्हैसूर]]चा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगळुराची जहागीर त्याचा सुभेदार [[हैदर अली]] याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बर्‍याचबऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ने हैदर अलीचा पुत्र [[टिपू सुलतान]] यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले