"चिंतामण गणेश कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''चिंतामणराव गणेश कोल्हटकर''' (जन्म : मृत्यू : ) हे मराठी गायक, नात्य...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''चिंतामणराव गणेश कोल्हटकर''' (जन्म : मृत्यू : ) हे मराठी गायक, नात्यनिर्माते आणि नट होते. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत इ.स. १९११मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले आणि त्यांचा भाग्योदय झाला. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत बलवंत नाटक कंपनी काढली.
 
'''चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके :'' ' पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. जेव्हा मराठी संगीत रंगभूमी धसरणीला लागली त्या सुमारास म्हणजे १९३३मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना(इ.स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीने पु.ल. देशपांड्यांना उदयास आणले.
 
चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या 'माझे नाटककार' या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक इ.स. १९६६मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते.
 
[[चित्तरंजन कोल्हटकर]] हे गाजलेले नट चिंतामणरावांचे सुपुत्र.