"मॅक्झिम गॉर्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ta:மாக்சிம் கார்கி
छोNo edit summary
ओळ ३७:
[[इ.स. १८९२|१८९२]] मध्ये [[तिफ्लिस]]मध्ये "द कॉकेशस" या वृत्तपत्रात काम करत असताना त्याने "गॉर्की" (अर्थ: कडवट) हे टोपणनाव वापरण्यास सुरुवात केली. त्याने [[इ.स. १८९८|१८९८]] मध्ये लिहिलेले Очерки и рассказы (निबंध व गोष्टी) हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरले आणि गॉर्की एक सुप्रसिद्ध लेखक बनला.
 
गॉर्कीला झारच्या (रशियन त्सार) सत्तेला खुला विरोध दर्शविण्यामुळे बर्‍याचबऱ्याच वेळा अटक देखील झाली. गॉर्कीचे बर्‍याचबऱ्याच क्रांतिकारकांशी देखील संबंध होते. [[इ.स. १९०२|१९०२]] साली त्याची [[लेनिन|लेनिनशी]] भेट झाली व ते दोघेही चांगले मित्र बनले. गॉर्कीने वृत्तपत्रांवरील सरकारी पकड दाखवून दिली व तिचा निषेधही केला. [[इ.स. १९०२|१९०२]] साली गॉर्कीची रशियन साहित्य अकादमीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली, परंतु [[झार निकोलस दुसरा]] याने ही निवड रद्द करण्यास अकादमीस भाग पाडले. या कृत्याच्या विरोधात [[आंतोन चेखव]] व [[व्लादमीर कोरोलेंको]] यांनी अकादमी सोडली.
 
[[इ.स. १९०५|१९०५]] सालच्या फसलेल्या राज्यक्रांतीच्या काळात तुरूंगामध्ये असताना गॉर्कीने सूर्याची पिल्ले हे नाटक लिहिले. या नाटकाची गोष्ट जरी १८६२ सालात दाखवली असली तरीही ते खरेतर तेव्हाच्या सद्य परिस्थितीवरच आधारित होते. याच वर्षी पुढे गॉर्कीने अधिकृतपणे [[बोल्शेविक]] पक्षात प्रवेश केला.