"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १८७०|१८७०]]; [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] - [[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९४४|१९४४]]; [[नाशिक]], महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिले चित्रपटनिर्माते होते. [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्मिलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.
 
[[सदस्य:Girishrashinkar|girish]] ०९:५७, १८ जानेवारी २०१२ (UTC)== कारकीर्द ==
३० एप्रिल १८७० रोजी दादासाहेब फाळके ह्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. वडिल संस्कृत पंडित.त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे प्रवेश घेतला. याच सुमारास त्यांना फोटोग्राफी, प्रोसेस फोटोग्राफी यांसारख्या गोष्टींचा छंद लागला. काही काळ त्यांनी बडोदा येथील कलाभवनात शिक्षण घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. ( पण दादासाहेबांना आकर्षण होतं ते रंगांचं , रेषांचं... म्हणूनच त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आणि बडोद्याच्या कलाभवनमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर ते आर्किटेक्चर शिकले आणि निसर्गचित्रांचे चित्रकार बनले. एका फोटोग्राफिक स्टुडिओमध्येही त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि नंतर पोर्ट्रेट फोटोग्राफर , तसंच चक्क जादूगार म्हणूनही त्यांनी किमया दाखवली. पुढच्या आयुष्यात त्यांनी कॅमे-यानं दाखवलेल्या जादुला तर सगळेच भुलले , ती जादू म्हणजे चित्रपट...
 
ओळ ३९:
आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर फाळके यांनी मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, कालिया मर्दन, गंगावतारम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला ‘बॉक्स ऑफिस हिट’ चित्रपट मानला जातो. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले. दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील २५ लघुपट त्यांनी निर्माण केले.
दादासाहेबांनी ' गंगावतरण ' हा शेवटचा चित्रपट १९३७ साली निर्माण केला. ' राजा हरिश्चंद ' ते ' गंगावतरण ' या प्रवासात दादासाहेबांनी प्रसिद्धी , पैसा आणि प्रतिष्ठेचं शिखर सर केलं खरं पण नियतीने कालौघात ते पुन्हा हिरावूनही घेतलं. फाळके कुटुंबाला अत्यंत विपन्नावस्था आली. त्यांना पुण्यात एका भाड्याच्या खोलीत दिवस कंठावे लागले. दादासाहेबांनी व्ही. शांतारामांना त्या घरी बोलावून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
 
'''#REDIRECT [[चित्रपट]]'''
१. राजा हरिश्चंद्र’
२.मोहिनी भस्मासूर
३.सत्यवान सावित्री
३.कालिया मर्दन
४.गंगावतारम
दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील २५ लघुपट त्यांनी निर्माण केले
 
 
या हेलावून टाकणा-या प्रसंगाचं वर्णन व्ही. शांताराम यांच्या ' शांताराम ' या जीवनचरित्रात वाचायला मिळतं. व्ही. शांताराम यांनी स्वत: तर मदत केलीच पण इतर सिनेनिर्मात्यांनाही त्यासाठी प्रवृत्त केलं. याच पैशातून १९३९-४० साली फाळके यांनी नाशिकाला बंगला बांधला. त्याला दादासाहेबांनी नाव दिलं ' हिंद सिने जनकाश्रम ' या ठिकाणी चार वर्षं परावलंबी आयुष्य जगल्यावर त्यांनी १६ फेब्रुवारी १९४४ रोजी इहलोकीची यात्रा संपवली. परंतु त्या दिवशी नाशकातली सगळी चित्रपटगृह खुली होती. चित्रपटाच्या बेगडी दुनियेनं आपल्या जन्मदात्याला तो हयात असतानाच बेदखल करून टाकलं होतं , मग नंतर त्याची दखल कोण घेणार ?