"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eu:Dhundiraj Govind Phalke
ओळ ३०:
 
== कारकीर्द ==
३० एप्रिल १८७० रोजी दादासाहेब फाळके ह्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. वडिल संस्कृत पंडित.त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे प्रवेश घेतला. याच सुमारास त्यांना फोटोग्राफी, प्रोसेस फोटोग्राफी यांसारख्या गोष्टींचा छंद लागला. काही काळ त्यांनी बडोदा येथील कलाभवनात शिक्षण घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. ( पण दादासाहेबांना आकर्षण होतं ते रंगांचं , रेषांचं... म्हणूनच त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आणि बडोद्याच्या कलाभवनमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर ते आर्किटेक्चर शिकले आणि निसर्गचित्रांचे चित्रकार बनले. एका फोटोग्राफिक स्टुडिओमध्येही त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि नंतर पोर्ट्रेट फोटोग्राफर , तसंच चक्क जादूगार म्हणूनही त्यांनी किमया दाखवली. पुढच्या आयुष्यात त्यांनी कॅमे-यानं दाखवलेल्या जादुला तर सगळेच भुलले , ती जादू म्हणजे चित्रपट...
=== चित्रपट ===
 
* राजा हरिश्चंद्र (मूकपट)
मुद्रणकलेचं शिक्षण घ्यायला जर्मनीला गेले होते. १९१० च्या नाताळात त्यांना ’ लाइफ ऑफ ख्राइस्ट ’ हा चित्रपट बघायला मिळाला. चित्रपट बघून ते अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांना आयुष्याचे ध्येय सापडले. त्यांनी उद्गगार काढले , ‘ लाइफ ऑफ ख्राइस्ट ’ सारखे आम्ही रामकृष्णांवर चित्रपट काढू. पुढचे दोन महिने त्यांनी चित्रपटावर उपलब्ध असलेले सर्व साहित्य अभ्यासले. शहरातील सर्व सिनेमे पाहिले. एका जुन्या मित्राकडून कर्ज मिळवून आणि आपली विमा पॉलिसी गहाण टाकून त्यांनी पैसे उभे केले आणि ते इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी आवश्यक ती साधने आणली. पण भारतात परतल्यावर पहिला चित्रपट निर्माण करण्यासाठी त्यांना कोणीही पैसा पुरवायला पुढे येईना.
* अयोध्येचा राजा
 
१९१२ मध्येच दादासाहेब फाळके यांनी ‘रोपट्यांची वाढ’ हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले. द. दा. दाबके व भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन दादासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वदेशी चित्रपटाची निर्मिती केली. ३ मे, १९१३ रोजी दादासाहेबांचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ मुंबईत (कोरोनेशन सिनेमा येथे) प्रदर्शित झाला. हाच भारतातील पहिला चित्रपट (मूकपट) होय. हा चित्रपट सुमारे ४० मिनिटांचा होता. आपल्या ह्या पहिल्याच चित्रपटात लेखक, रंगवेशभूषाकार, संकलक, कलादिग्दर्शक अशा विविध भूमिका दादासाहेबांनी एकट्यानेच पार पाडल्या. या चित्रपटात हिंदी व इंग्रजी सबटायटल्सची योजना करण्यात आली होती. त्या काळात ते स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली, भारतातच राहणे पसंत केले.
 
शेवटी स्वत:च्या पत्नीची सौभाग्यलेणी सावकाराकडे सुपूर्त करून उभारलेल्या पैशातून त्यांनी ' राजा हरिश्चंद ' हा भारतातील पहिला चित्रपट पूर्ण केला. त्याची लांबी ३७०० फूट होती. कॉर्पोरेशन सिनेमागृहात ३ मे १९१३ ला या चित्रपटाचा पहिला खेळ झाला. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी ‘ मोहिनी-भस्मासूर ’ आणि ‘ सत्यवान-सावित्री ’ या चित्रपटांची निर्मिती केली. पुढे दादासाहेबांनी तयार केलेल्या ' लंकादहन ' ने तर एवढं अपूर्व यश मिळवलं की , त्यांच्या घरी लक्ष्मी चारी पावली चालत आली. एका बैलगाडीवर पैशाच्या राशी लावून फाळके नाशिकच्या दिशेने जात आहेत , असं चित्र त्याकाळी ' टाइम्स ऑफ इंडिया ' त प्रसिद्ध झालं होतं.
आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर फाळके यांनी मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, कालिया मर्दन, गंगावतारम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला ‘बॉक्स ऑफिस हिट’ चित्रपट मानला जातो. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले. दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील २५ लघुपट त्यांनी निर्माण केले.
दादासाहेबांनी ' गंगावतरण ' हा शेवटचा चित्रपट १९३७ साली निर्माण केला. ' राजा हरिश्चंद ' ते ' गंगावतरण ' या प्रवासात दादासाहेबांनी प्रसिद्धी , पैसा आणि प्रतिष्ठेचं शिखर सर केलं खरं पण नियतीने कालौघात ते पुन्हा हिरावूनही घेतलं. फाळके कुटुंबाला अत्यंत विपन्नावस्था आली. त्यांना पुण्यात एका भाड्याच्या खोलीत दिवस कंठावे लागले. दादासाहेबांनी व्ही. शांतारामांना त्या घरी बोलावून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
 
या हेलावून टाकणा-या प्रसंगाचं वर्णन व्ही. शांताराम यांच्या ' शांताराम ' या जीवनचरित्रात वाचायला मिळतं. व्ही. शांताराम यांनी स्वत: तर मदत केलीच पण इतर सिनेनिर्मात्यांनाही त्यासाठी प्रवृत्त केलं. याच पैशातून १९३९-४० साली फाळके यांनी नाशिकाला बंगला बांधला. त्याला दादासाहेबांनी नाव दिलं ' हिंद सिने जनकाश्रम ' या ठिकाणी चार वर्षं परावलंबी आयुष्य जगल्यावर त्यांनी १६ फेब्रुवारी १९४४ रोजी इहलोकीची यात्रा संपवली. परंतु त्या दिवशी नाशकातली सगळी चित्रपटगृह खुली होती. चित्रपटाच्या बेगडी दुनियेनं आपल्या जन्मदात्याला तो हयात असतानाच बेदखल करून टाकलं होतं , मग नंतर त्याची दखल कोण घेणार ?
 
पैसा, मनुष्यबळ सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृक्‌श्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, कलात्मक दृष्टीकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.
दादासाहेब फाळके यांच्या योगदानामुळे सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून केंद्र शासनाने ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला पण , या चित्रमहर्षीला जनता कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजही सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीला सर्वोच्च प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. रंगीबेरंगी दुनिया पडद्यावर साकारणा-या या चित्रमहर्षीला सलाम!!!
 
== हेही पाहा ==