"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
 
त्रिभुज प्रदेश निर्मिती ही नदीवर अवलंबून असते आणि लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा जास्त परिणाम होताना दिसत नाही. बर्‍याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे विविध फाटे पडल्यासारखा असतो. ग्रीक मूळाक्षर डेल्टा हे चिन्ह त्रिकोणाकृती आहे. यावरून हे इंग्रजी नाव पडले आहे.त्रिभुज प्रदेश सखल मैदानी असून त्याची उंची २० मीटर पेक्षा जास्त नसते.
तसेच या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते. १) नदीतील गाळाचे प्रमाण २) नदीचा मुखाजवळील वेग ३) सागराची खोली ४) त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य ५) सागरप्रवाह
 
सर्वात प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश [[नाईल नदी| नाईल नदीवर]] आहे. [[गंगा]]-[[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांनी केलेले [[बांग्लादेश | बांग्लादेशमधील]] त्रिभुजप्रदेश, [[कृष्णा]], [[गोदावरी]], [[कावेरी नदी|कावेरी]], [[अमेझॉन]], [[मिसिसीपी]], [[र्‍हाईन]], [[डॅन्युब]] इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश ही प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे.