"पंचतंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
मूळ संस्कृत भाषेत असलेले पंचतंत्र या इ. स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णु शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्र भेद, मित्र सम्प्रप्ति, काकोलूकीयम, लब्धप्रणाशम आणि अपरीक्षितकारम असे पाच भाग असून यात पशु-पक्षांच्या रुपाकातून माणसाला व्यवहार चातुर्य सांगितले आहे.
 
एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा महिलारोप्य वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी राजा होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख, व्यवहार शून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहार कुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा त्याने उचलला. विष्णु शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र.पंचतंत्र हि एक नीतिकथा आहे. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धुर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे.
 
नितीकथेचे मुल ऋग्वेदातील मंडूक सुकतात आहे.मान्दुकाना विनोदाने 'ब्राह्मणा व्रत्चारीन:' म्हटले आहे.तशीच तेथे एक मनुष्य व मासा यांची कथा येते. छांदोग्य उपनिषदात सत्यकाम जबालाने पशुपक्ष्यांपासून उपदेश घेतला अशी माहिती मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतंत्र" पासून हुडकले