"भीष्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: ta:வீடுமர்)
[[Image:Bheeshma oath by RRV.jpg|right|thumb|290px|देवव्रत यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली.<br>[[राजा रविवर्मा]] यांचे चित्र.]]
'''भीष्म''' ही [[महाभारत]] या महाकाव्यातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. तो हस्तिनापुराचा राजा [[शंतनू]] व [[गंगा]] यांचा पुत्र होता. राजा शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच वंशजांना हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून भीष्माने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. पुढे सत्यवतीचा मुलगा [[विचित्रवीर्य]] ह्याच्या विवाहासाठी त्याने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबा हिचे सौभपती शाल्व ह्याचावर प्रेम असल्याचे कळल्यावर त्याने अंबेस शाल्वाकडे धाडले. परंतु, शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या करून [[शिखंडी]] म्हणून पुनर्जन्म घेतल्याची कथा महाभारतात वर्णिली आहे.
[[महाभारत|महाभारतातील]] वादातीत व भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णापासून]] सामान्यजनांपर्यंत ज्यांचा आदर होत असे असे एकमेव व्यक्तिमत्त्व ते म्हणजे भीष्म. महाराज [[शंतनु]] व [[गंगा]] यांचा मुलगा [[देवव्रत]] हाच पुढे त्याच्या कठोर(भीषण) प्रतिज्ञेमुळे भीष्म या नावाने ओळखला जाऊ लागला. आपल्या युद्ध कौशल्यांनी त्यांनी आपले [[गुरु]] प्रत्यक्ष भगवान [[परशुराम]] यांनाही पराजित केले होते. आपल्या प्रतिज्ञेमुळे ते [[कौरव|कौरवांच्या]] पक्षाकडे असले तरी त्यांचा कल सत्यप्रिय [[पांडव|पांडवांकडेच]] होता. आपली आई [[गंगा]] हिच्या आशीर्वादाने भीष्म हे इच्छामरणी होते. आजन्म ब्रह्मचर्य व कुरू सिंहासनाचे रक्षण या प्रतिज्ञेचे आपल्या मृत्युपर्यंत त्यांनी पालन केले. कठोर प्रतिज्ञेला आजही [[भीष्मप्रतिज्ञा]] म्हणून संबोधले जाते.
 
महाभारतीय युद्धात भीष्मांनी सेनापती म्ह्णून कुरूसैन्याचे नेतृत्व केले. भीष्म हे शिखंडीवर शस्त्र उचलत नसत, म्हणून त्याला पुढे घालून [[अर्जुन|अर्जुनाने]] भीष्मांचा युद्धात पाडाव केला. तेव्हा [[दक्षिणायन]] लागेपर्यंत प्राण रोधून त्यांनी युद्धभूमीवर प्राणत्याग केला.
 
{{महाभारत}}
१०६

संपादने