"जॉर्ज हॅरिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''जॉर्ज हॅरिसन''' (२५ फेब्रुवारी १९४३ - २९ नोव्हेंबर २००१): ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक-गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते. ''बीटल्स'' या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बॅंडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला बीटल्स हा बॅंड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ''ट्रॅव्हलिंग विल्बरीज'' बॅंडचे संस्थापक सदस्यही झाले. ''रोलिंग स्टोन'' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले. बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाददुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे.
 
१९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला.
 
हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. ''आय, मी, माईन'' हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८०मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होत