"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mamoni raysam.jpg|right|thumb|250px|इंदिरा गोस्वामी]]
'''इंदिरा गोस्वामी''' ([[रोमन लिपी]]: ''Indira Goswami'', [[आसामी भाषा|आसामी]] ''মামণি ৰয়ছম গোস্বামী'' ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; [[गोहत्तीगुवाहाटी]], [[ब्रिटिश भारत]] - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; [[गुवाहाटी]], [[आसाम]], [[भारत]]) ह्या [[आसामी भाषा|आसामी]] लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात.
 
==जीवन==
इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील [[गोलपारा]] सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये [[दिल्ली विश्वविद्यालय|दिल्ली विश्वविद्यालयाच्या]] आधुनिक भारतीय [[भाषा]] विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. [[तुलसीदास]]विरचित [[रामायण]] आणि आसामी भाषेतील [[माधव कंदली]] यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करुन इ.स. १९७३ साली त्यांनी [[गुवाहाटी विद्यापीठ|गोहत्ती विद्यापीठाची]] डॉक्टरेट मिळवली.
 
==लेखनाचा वारसा==
लेखनाचा वारसा इंदिरा गोस्वामी यांना आपल्या आजोबांकडून मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी नरकासुरवध नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यावर त्याकाळी ब्रिटिश अधिकार्‍यांनी बंदी आणली होती. {{संदर्भ हवा}} कारण या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांना अप्रत्यक्षपणे असुर म्हणून उल्लेखिले होते.