"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
# ऋणप्रभार असणारे अर्धवाहक (एन-टाइप).
 
पी-टाइप अर्धवाहक पदार्थात धनप्रभार असणारी छिद्रे ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Hole'', ''होल'' ; अर्थ: इलेक्ट्रॉनांच्या अनुपस्थितीने निर्माण झालेल्या रिकाम्या जागा) जास्त प्रमाणात असतात तर एन-टाइप अर्धवाहक पदार्थात ऋणप्रभार वाहून नेणारे इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात असतात. संक्षिप्त स्वरूपात त्यांचा उल्लेख अनुक्रमे पी आणि एन (पी म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन म्हणजे नेगेटिव्ह) असाच केला जातो. जेव्हा एक धनप्रभारित आणि एक ऋणप्रभारित अर्धवाहक पदार्थ एकमेकांस रासायनिक प्रक्रियेने चिटकवले जातात तेव्हा डायोड निर्माण होतो. विद्युत उपकरणांत वापरतांना 'पी'ला [[धनाग्र]] अर्थात ''अ‍ॅनोड'' तर 'एन'ला [[ऋणाग्र]] अर्थात ''कॅथोड'', असे म्हटले जाते. जेव्हा [[विजेरी|बॅटरी]]चे धन टोक धनाग्राला व ऋण टोक ऋणाग्राला जोडले जाते, तेव्हाच डायोडमधून विद्युत प्रवाह जातो. याउलट जोडणी केली, तर मात्र डायोड [[विद्युतरोधक|विद्युतरोधकाप्रमाणे]] काम करतो. म्हणजे डायोड हा [[झडप|झडपेप्रमाणे]] काम करतो. त्याच्या याच मूलभूत गुणाचा उपयोग [[इलेक्ट्रॉनिकी]]मध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
 
एल्ईडी बनवतांना पी-टाइप व एन-टाइप अर्धवाहक असे निवडले जातात, जेणेकरून त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या विद्युतप्रभारांच्या पातळ्यांत पुरेसा फरक आहे. एल्ईडीमध्ये जेव्हा बॅटरीचे धन टोक धनाग्राला व ऋण टोक ऋणाग्राला जोडले जाते, तेव्हा इलेक्ट्रॉन 'एन' भागातून 'पी' भागात जातात. 'पी' भागात इलेक्ट्रॉन येताच ते तेथील छिद्रांमध्ये सामावले जातात. ही छिद्रे इलेक्ट्रॉनांच्या अनुपस्थितीने निर्माण झालेली असतात. येथे 'पी' भागातल्या इलेक्ट्रॉनची विद्दुतप्रभार पातळी 'एन' भागातल्या इलेक्ट्रॉनांपेक्षा कमी असल्याने ते इलेक्ट्रॉन छिद्रामध्य्रे सामावण्यापूर्वी आपली अतिरिक्त ठरलेली ऊर्जा [[फोटॉन|फोटॉनांच्या]] स्वरूपात बाहेर टाकतात. अशा प्रकारे एल्ईडीतून प्रकाशनिर्मिती होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/एलईडी" पासून हुडकले