"विनायकबुवा पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे, इ. स. १९३२ रोजी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित [[दत्तात्रेय विष्णू पलुसकर]], पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. इ. स. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गंधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले.
 
ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे.. विनायकराव हे त्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी 'राग विज्ञान' (सात खंड), 'नाट्य संगीत प्रकाश' आणि 'महाराष्ट्र संगीत प्रकाश' ही पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले.
 
पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ [[सोव्हियेत संघ]], [[पोलंड]] व [[चेकोस्लोव्हाकिया]] या राष्ट्रांचा दौरा करून आले होते.