"जोसेफ स्टॅलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
स्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले.
 
१८९४ पासून स्टालिन राजकीय क्रांतीसाठी काम करू लागले. लवकरच स्थानिक पोलीस त्यांच्या मागे लागले. त्यांच्या जाचातून सुटता यावे म्हणून स्टालिन मग [[बाकू|बाकु]] व बाटुमच्या कामगार संघटनांमध्ये प्रचार कार्य करू लागले. १९०२ साली संपात सहभागी झाल्याबद्दल जोसेफ स्टालिन यांना अटक करून १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली तसेच त्या शिक्षेनंतर [[सायबेरिया|सायबेरियात]] हद्दपारीची शिक्षाही देण्यात आली. पण स्टालिन एका महिन्याच्या आतच कैदेतून निसटले. १९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले. याच काळात स्टालिन यांना एकूण ८ वेळा पकडण्यात आले पैकी ७ वेळा त्यांना हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. त्यांनी बदलेल्या अनेक नावांपैकी '''स्टालिन''' हेही एक नाव होते. पुढे स्टालिन हे नाव कठोर, पोलादी, कणखर ध्येयाचे प्रतीक बनले.
 
[[चित्र:Vladimir Lenin and Joseph Stalin, 1919.jpg|200px|right|thumb|उजवीकडून '''[[लेनिन]] आणि जोसेफ स्टालिन १९१९''']]
६३,६६५

संपादने