"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
खेबूडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.
 
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा.भ. बोरकर|बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
 
== कारकीर्द ==