"विश्वकर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो moving content to aptly named category वर्ग:हिंदू दैवते using AWB
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
भगवान '''विश्वकर्मा''' [[देव|देवांचे]] [[वास्तुकला]] [[तज्ञ]] आहेत. त्यांनी भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णासाठी]] द्वारका,[[पांडव|पांडवासाठी]] [[हस्तिनापुर|हस्तिनापूर]] व [[रावण|रावणासाठी]] [[सोने|सोन्याची]] लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते [[वास्तुशास्त्र|वास्तुशास्त्राचे]] पहिले प्रणेते आहेत.भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी [[श्रीराम|श्रीरामाला]] सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली [[हनुमान]], नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी [[रामसेतू]] बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.{{चित्र हवे}}
 
त्यांनी 'विश्वकर्मा वास्तुशास्त्र' या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना [[सौर उर्जा]] वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. [[सूर्य|सूर्याचे]] या शक्तिचा वापर करून त्यांनी [[विष्णु]] [[शिव]] व [[इंद्र|इंद्रासाठी]] क्रमाने [[सुदर्शन चक्र]], [[त्रिशूळ]] व विजय रथ निर्माण केला.ते हरहुन्नरी होते.अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात, त्याचे नियम ठरविण्यात,व त्या त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला.शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, विमान आदिंचेही त्यांनी निर्माण केले.सुमारे १२००च्या जवळपास यंत्र-तंत्र,शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती केली.[[पांडव|पांडवांसाठी]] [[मयसभा]] बनविणारा [[मयासूर]] त्यांचा शिष्यच होता.{{संदर्भ हवा}}