"बाराशिंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
याचा वावर मुख्यत्वे मध्यभारतातील [[कान्हा]] अभयारण्यात आहे. एक वेळ अशी होती कि हे हरीण जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होते [[कान्हा]] अभयारण्यात १९७० मध्ये केवळ ६६ हरीणांची नोंद झाली होती. परंतु वन्य जीव कायद्याने याच्या शिकारीवर बंदी आणली व कान्हामध्ये याच्या संवर्धनावर विशेष प्रयत्न झाले आज त्याचा परीणाम म्हणून १००० पेक्षाही जास्त बाराशिंगा कान्हामध्ये आहेत. महाराष्ट्रात बरीच पुर्वी विदर्भाच्या जंगलामध्ये आढळत परंतु आता नाहित.
 
[[चित्र:Cervus duvauceli branderi.jpg|thumb|left|300 px|कान्हा अभयारण्यातील बाराशिंगा हरीणांचा कळप]]तसेच याची दुसरी उपजात आसाम, नेपाल बांगलादेश व [[नैरुत्य]] भारतात आढळते. [[सुंदरबन]] व [[काझीरंगा राष्ट्रीय उद्यान|काझीरंगामध्ये]] प्रामुख्याने दलदलीच्याच प्रदेशात आढळते. याच्या दलदलीच्या प्रदेशात रहात असल्याने इंग्रजीत Swamp Deer म्हणतात. परंतु मध्य भारतातील जात ही घनदाट जंगलात आढळते.
 
बाराशिंगा हे तसे मोठे हरीण आहे. याची खांद्यापर्यंत उंची सव्वा ते दीड मीटर पर्यंत भरते व मोठ्या नराचे वजन दीडशे किलो पेक्षाही जास्त भरू शकते. याचा शिंगाचा आकर्षक डोलारा ७५ सेमी पर्यंत असतो. वीणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत असतो. मादी एका वेळेस बहुतेक हरीणांप्रमाणे एकच पिल्लाला जन्म देते. नर व माद्या हे कळप करून रहातात. त्यांचा कळप ८ ते २० जणांचा असतो. एकटे नर तसे कमी असतात.