"साप्ताहिक विवेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
* या काळात बाळासाहेब गायकवाड यांचे ‘ख्रिस्ती महार’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मुखपृष्ठकथा ‘विवेक’ने केली होती. या मुखपृष्ठकथेमुळे शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] यांनी ख्रिस्ती महार हा विषय उचलून धरला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय विषयसूचीवर एक वर्ष हा विषय गाजत राहिला. [[इ.स. १९८७]] साली [[डॉ. गंगाधर पानतावणे]] समरसता परिषदेला आले म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने त्यांना बहिष्कृत केले. त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी ‘विवेक’ने उपलब्ध करून दिली होती.
 
* [[इ.स. १९९०]] पासुन महाराष्ट्रात भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न विविध प्रकारे समाजापुढे आणण्याचे काम ‘विवेक’ने स्वीकारले. [[इ.स. १९९३]] सालापासून दर दिवाळी अंकात एकेका भटक्या-विमुक्त जमातीचा परिचय गिरीश प्रभुणे कथारूपाने करून दिला. या लेखांचे पुढे [[पालावरचं जिणं]] या नावाने पुस्तक प्रकाशित झाले. [[इ.स. १९९५]] साली ‘विवेक’चे कार्यकारी [[संपादक]] रमेश पतंगे यांचे ‘मी, मनु आणि संघ’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची [[हिंदी भाषा]], [[गुजराती]], [[तमिळ]], [[तेलगू]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] अशा विविध भाषांत भाषांतरे झाली.
 
* भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला यमगरवाडी प्रकल्पापाठोपाठ सुरुवात होऊन मगरसांगवी, अनसरवाडा, नेरले या गावी आणखी काही प्रमुख प्रकल्प उभे राहिले. विवेकच्या वाचकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी वर्गणीसोबत महिन्याला एक रुपया याप्रमाणे १२/- रुपये प्रकल्पाला दान द्यावेत. या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता दर वर्षी भटके-विमुक्त विकास प्रकल्पासाठी सहा ते सात लाख रुपयांचे आर्थिक मदत या साप्ताहिकामार्फत दिली जाते. पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारून अनन्वित अन्याय आणि अत्याचार होतात. त्यांना वाचा फोडण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे. दुर्योधन काळे या पारधी युवकाची [[पोलिस|पोलिसांनी]] हत्या केली. या हत्येची पूर्ण बातमी ‘विवेक’मध्ये प्रकाशित झाली. पुढे या हत्याप्रकरणी पोलीस निलंबित झाले. त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना शिक्षाही झाली होती.