"सोव्हियेत संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
[[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्राचा]] सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला [[कास्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील '''बैकाल''' सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते.
 
विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हर्कोयान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला [[कॉकेशस]] पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच [[पामीर]], तिआनशान आणि [[अलताई]] पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोवियेत संघाचे विभाजन करणार्‍या [[उरल पर्वतरांग|उरल]] पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोवियेत संघास लाभल्या होत्या.
 
१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोवियेत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील [[रशिया]] राज्य सगळ्यात मोठे होते, सोवियेत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोवियेत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटाचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म ऑर्थोडोक्स [[ख्रिश्चन]] हा होता. तीन गटात मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) '''ग्रेट रशियन्स''' - रशियात राहणारे, (२) '''लिटल रशियन्स''' - [[युक्रेन]] मध्ये राहणारे, (३) '''व्हाईट रशियन्स''' - [[बेलोरशिया|बेलोरशियात]] राहणारे असे प्रमुख लोक राहत.