"ल्याओनिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.ln.gov.cn/
}}
'''ल्याओनिंग''' (देवनागरी लेखनभेद: '''ल्यावनिंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 辽宁; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 遼寧; [[फीनयीन]]: ''Liáoníng'') हा [[चीन]] देशाच्या [[ईशान्य दिशा|ईशान्येकडील]] प्रांत आहे. याच्या दक्षिणेस [[पीत समुद्र]] व बोहाय समुद्र, [[आग्नेय दिशा|आग्नेयेस]] [[उत्तर कोरिया|उत्तर कोरियाशी]] संलग्न आंतरराष्ट्रीय सीमा, ईशान्येस [[चीलिन]] प्रांत, पश्चिमेस [[हपै]] प्रांत, तर [[वायव्य|वायव्येस]] [[आंतरिक मंगोलिया]] वसले आहेत. [[षन्यांग]] येथे ल्याओनिंगाची राजधानी आहे.
 
ल्याओनिंगाचे एका चिन्हातले लघुरूप "辽" (फीनयीन: ''liáo'', ''ल्याओ'' ;) हे या प्रदेशाचे ऐतिहासिक काळापासून रूढ असलेले नाव आहे. इ.स. ९०७ ते इ.स. ११२५ या काळात या प्रदेशावर राज्य केलेल्या ल्याओ वंशावरून हे नाव पडले. आधुनिक काळात इ.स. १९०७ साली फंगथ्यान (चिनी लिपी: 奉天 ; फीनयीन: ''Fèngtiān'' ;) नावाने या प्रांताची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२९ साली फंगथ्यान हे नाव बदलून ल्याओनिंग असे नवीन नाव ठेवण्यात आले. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धकाळात]] जपान-प्रभावित कळसूत्री मांचूकुओ राजवटीत पुन्हा इ.स. १९०७ सालातले नाव स्वीकारण्यात आले; मात्र महायुद्ध संपताच इ.स. १९४५ साली पूर्ववत ल्याओनिंग हेच नाव ठेवले गेले.