"इलेक्ट्रॉनिक वाणिज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: km:E-commerce, ta:இலத்திரனியல் வர்த்தகம்
छोNo edit summary
ओळ १:
'''इलेक्ट्रॉनिक वाणिज्य''', अर्थात '''इलेक्ट्रॉनिक कॉमर्स''' किंवा '''इ-कॉमर्स''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Electronic commerce'', ''e-commerce'' ;) म्हणजे [[इंटरनेटमहाजाल|इंटरनेटाद्वारे]] उत्पादन आणि सेवांची करता येणारी खरेदी आणि विक्री होय. इंटरनेटाच्या वाढत्या व्यापामुले आणि त्याचा लोकप्रियतेमुळे इंटरनेटावरील व्यापाराला कमालीची चालना मिळालेली आहे. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतर, पुरवठा व्यवस्थापन करणे, इंटरनेट-आधारित विपणन, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक डेटा आंतरबदल, वस्तुसूची व्यवस्थापन प्रणाली आणि स्वयंचलित डेटा संग्रहण या नव्या इंटरनेट-आधारित सुविधांचा इलेक्ट्रॉनिक वाणिज्याच्या प्रसारात महत्त्वाचा वाटा आहे.
 
इलेक्ट्रॉनिक वाणिज्याच्या वापराचा मोठा हिस्सा फक्त आभासी किंवा संकेतस्थळावर उपलब्ध असणार्‍या अशा गोष्टींसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ एखादा लेख किंवा एखादी महत्त्वाची माहिती जी फक्त इ-पेमेंट केल्यावरच पाहता येते. बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉनिक वाणिज्याबरोबर वस्तू किंवा माल ह्यांची वाहतुकीद्वारे पोचही जोडली गेलेली असते. ऑनलाईन किरकोळ विक्रेत्यांना इ-टेलर म्हणतात आणि किरकोल विक्रीला इ-टेल म्हणतात. जवळपास सगळेच मोठे किरकोळ व्यापारी आज इलेक्ट्रॉनिक वाणिज्याद्वारे आंतरजालाशी जोडले गेले आहेत.