"हारुकी मुराकामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४२:
[[तोक्यो]] येथील वासेदा विद्यापीठात त्याने नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. तेथेच त्याची व पत्नी योको हिची प्रथम गाठ पडली. त्याने पहिली नोकरी एका रेकॉर्ड दुकानात धरली. (नॉर्वेजियन वूड या त्याच्या कादंबरीतले एक मुख्य पात्र, तोरू वातानाबेदेखील तेथेच नोकरी करताना दाखवला आहे.) अभ्यासक्रम संपत आलेला असतानाच मुराकामीने त्याच्या पत्नीच्या साथीने 'पीटर कॅट' नावाचे एक कॉफीहाऊस (जे संध्याकाळी जाझ बार असे) कोकुबुंजी, तोक्यो येथे सुरू केले. हा बार त्यांनी [[इ.स. १९७४]]पासून [[इ.स. १९८१]]पर्यंत चालवला.
 
त्याच्या बहुतांश कादंबर्‍यांतील मध्यवर्ती संकल्पना व शीर्षके ही शास्त्रीय संगीताशी निगडित असतात. उदा. द वाइंड-अप बर्ड क्रॉनिकलातील तीन पुस्तके. यांपैकी 'द थिविंग मॅगपाय' रोझिनीच्या ऑपेरा ओव्हरशरावर बेतले आहे, 'बर्ड अ‍ॅज प्रॉफेट' हे रॉबर्ट शुमन याच्या [[इंग्लिश भाषा|इंग्लिशीत]] द प्रॉफेट बर्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या पियानो संगीताच्या तुकड्यावर आधारित असून 'द बर्ड कॅचर' हे मोझार्टाच्या द मॅजिक फ्लूट या ऑपेर्‍यातल्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.
 
मुराकामी हा मॅराथॉन व ट्रायथलॉन धावपटू आहे. त्याने वयाच्या तेहतिसाव्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. [[जून २६]], [[इ.स. १९९६]] साली त्याने पहिली अल्ट्रामॅराथॉन (होक्काइडो येथील सरोमा सरोवराभोवतीची १०० किलोमीट‍रची शर्यत) पूर्ण केली. त्याच्या धावण्यासंबंधी त्याने [[इ.स. २००८]] साली प्रकाशित केलेल्या त्याच्या ''व्हॉट आय टॉक अबाऊट व्हेन आय टॉक अबाऊट रनिंग'' या पुस्तकात लिहिले आहे.