"रोशन आरा बेगम (गायिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४७:
 
==सांगीतिक कारकीर्द==
पाकिस्तानाला स्थलांतरित होण्यापूर्वी फाळणीपूर्व भारतात रोशनआरा बेगम यांना किराणा घराण्याच्या शैलीत ख्याल गायन करणार्‍या उत्तम गायिका म्हणून प्रसिद्धी व स्थान प्राप्त झाले होते. [[इ. स. १९४८]] मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झाल्यावर रोशनआरा बेगम यांनी आपल्या पतींच्या लालामुसा ह्या छोट्याशा गावी बस्तान बसविले. त्या गावापासून लाहोर बरेच लांब होते. तेव्हा लाहोर हे पाकिस्तानाचे सांस्कृतिक केंद्र मानले जायचे. परंतु रोशन आरा बेगम अंतराची पर्वा न करता संगीत जलसे व रेडिओवरील कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी नित्य लाहोरापर्यंत प्रवास करत असत.
 
त्यांनी अनेक चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले. पहली नजर ([[इ. स. १९४५]]), जुगनू ([[इ.स. १९४७]]), किस्मत ([[इ. स. १९५६]]), रूपमती बाझबहाद्दर ([[इ. स. १९६०]]), नीला परबत ([[इ. स. १९६९]]) हे त्यातील काही चित्रपट होत. त्यांच्या गायन मैफिलींची ध्वनिमुद्रणेही उपलब्ध आहेत.