"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: सॉफ्टवेअर → सॉफ्टवेर (15)
छोNo edit summary
ओळ २७:
लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]ही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या '[[लिनस टोरवाल्ड्स]]'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेरे, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेर, ही '''[[ग्नू प्रकल्प|ग्नू प्रकल्पाने]]''' विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव [[#'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स'|ग्नू/लिनक्स]] हे आहे. (खालील ''लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)
लिनक्स सुरुवातीला [[इंटेल-३८६]] [[मायक्रोप्रोसेसर]]वर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या [[व्यक्तिगत संगणक]], [[महासंगणक]], तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.[[गूगल]] कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. [[आयबीएमआय.बी.एम.]] , [[ह्युलेट-पॅकार्ड|एचपी]], अधिक विकसित करीत आहेत. [[सेवा संगणक]] क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा [[विंडोज]] आणि [[युनिक्स]] यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात.
 
= इतिहास =
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले