"चांदबिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.4.6) (सांगकाम्याने वाढविले: de, hi, pnb, ur
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:ChandBibiHawking.png|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''चांदबिबी''' (अन्य नावे, लेखनभेद: '''चांद बीबी''', '''चांद सुलताना''', '''चांद खातुन''' ;) (इ.स. १५५० - इ.स. १५९९) ही [[विजापूर|विजापुराची]] [[आदिलशाही]] व [[अहमदनगराची निजामशाही|अहमदनगराची निजामशाही]] या [[दख्खन|दख्खनेतील]] सल्तनतींची राज्यपालक राणी होती. हिने निजामशाही सैन्याचे नेतॄत्व सांभाळत निजामशाही बुडवण्यासाठी चालून आलेल्या [[अकबर|अकबराच्या]] [[मुघल साम्राज्य|मुघल]] सैन्यास अल्प काळ रोखून धरले.
 
== जीवन ==
चांदबिबी ही [[अहमदनगराची निजामशाही|अहमदनगराचा निजामशाह]] पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुर्‍हाण-उल मुल्काची बहीण होती. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की भाषा येत होत्या. चांदबिबीचा विवाह विजापुराचा [[पहिला अली आदिलशाह]] याच्याशी झाला.
 
== अहमदनगराच्या निजामशाहीचे रक्षण ==
इ.स. १५८० पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. सुमारे दशकभर चाललेल्या उलथापालथीअखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबिबी [[अहमदनगराची निजामशाही|निजामशाहीतील अहमदनगरास]] परतली. इ.स. १५९६ ते इ.स. १५९९ या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले. नोव्हेंबर, इ.स. १५९५ मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी [[मुघल साम्राज्य|मुघलांनी]] अहमदनगरावर चाल केली. तेव्हा हिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मुघल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले. कालांतराने चांदबिबीची मुघलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मुघलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला. निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चंदबिबीची हत्या केली. हिच्या मृत्यूनंतर चारच महिन्यांमध्ये मुघलांनी अहमदनगराचा पाडाव केला.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चांदबिबी" पासून हुडकले