"तरुण भारत (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: en:Tarun Bharat
No edit summary
ओळ ४:
 
नागपूरातील तरुण भारत "श्री नरकेसरी प्रकाशन" कडून प्रकाशित केले जाते. <ref>http://tarunbharat.net/site.aboutus</ref>
 
==मागोवा...==
आज विदर्भातील सांस्कृतिक गरज झालेल्या व विदर्भात विचारपत्र म्हणून ठसा उमटविणार्‍या दैनिक ‘तरुण भारत’ची परंपरा, मधला १८ वर्षांचा खंडित काळ वगळता, ८३ वर्षे जुनी आहे.
 
==इतिहास==
लोकमान्य टिळकपक्षीय ‘प्रतिसहकार पक्ष’ व महात्मा गांधींच्या अनुयायांचा ‘स्वराज्य पक्ष’ या कॉंग्रेसांंतर्गत दोन गटांच्या नीति-धोरणातील परस्परविरोधामुळे प्रतिसहकार पक्षाचा पुरस्कार करणार्‍या ‘महाराष्ट्र’ या वर्तमानपत्राकडून स्वराज्य पक्षीयांची कुचंबणा होऊ लागली, तेव्हा स्वराज पक्षाचे नरकेसरी बॅ. अभ्यंकर, श्री. दादासाहेब उधोजी आणि डॉ. ना. भा. खरे यांनी पुढाकार घेऊन २० जानेवारी १९२६ रोजी डॉ. खरे यांच्या संपादकत्वाखाली ‘तरुण भारत’ नावाचे साप्ताहिक, राष्ट्रीय सभा आणि स्वराज्य पक्ष यांच्या ध्येयधोरणाच्या प्रचारासाठी सुरू केले.
१९३० च्या असहकार आंदोलनात सरकारची वक्रदृष्टी आणि कर्त्या मंडळींचा कारावास यामुळे हे साप्ताहिक बंद पडले. पुढे बॅ. अभ्यंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायी मंडळींनी, अभ्यंकरांच्या ९ व्या स्मृतिदिनी २.१.१९४४ रोजी ‘तरुण भारत’ साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन केले. ‘महाराष्ट्र’ पत्राच्या संपादक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार श्री. ग. त्र्यं. उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर यांची या पुनरुज्जीवित ‘तरुण भारत’च्या संपादकपदी नेमणूक करण्यात आली.
तरुण भारत ‘दैनिक’ झाल्यावर ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम विचारवंत, पत्रपंडित गजानन त्र्यंबक उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर या दैनिकाचे संस्थापक संपादक झाले. भाऊसाहेबांच्या काळात ‘तरुण भारत’ने नवनवीन उपक्रम राबवून मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘तरुण भारत’ला सन्मानाचे स्थान मिळवून दिले. मध्य भारतातील एक महत्त्वाचे दैनिक म्हणून ‘तरुण भारत’चे नाव घेतले जाऊ लागले.
 
==संकटांची मालिका==
पण, गांधी-हत्येनंतर संकटांची मोठी मालिका तरुण भारतवर येऊन कोसळली. स्वत: भाऊसाहेबांना आपल्या पत्नी व मुलांसह राजे प्रतापसिंहराव भोसले यांच्या राजवाड्यात आणि नंतर नागपूरबाहेरच्या चिचभवन भागात आश्रय घ्यावा लागला. त्यावेळी वातावरणात एवढा क्षोभ होता की, दैनिक तरुण भारतची छपाई-यंत्रसामग्री देखील संतप्त जमावाने शुक्रवार तलावात फेकून दिली होती. या प्रसंगानंतरही भाऊसाहेब खचले नाहीत आणि अवघ्या १४ दिवसांनी पुन्हा ‘तरुण भारत’ प्रकाशित करण्याचा विक्रम या दैनिकाच्या मागे उभ्या असलेल्या मंडळीनी प्रस्थापित केला.
 
==श्री नरकेसरी प्रकाशन==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक झालेले श्री. बाळासाहेब देवरस ‘तरुण भारत’ ची धावपळ बघत होते. त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि ‘तरुण भारत’चे प्रकाशन पूर्ववत् सुरू झाले. नवीन संचालक मंडळ स्थापन झाले आणि श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेकडे या प्रकाशनाची जबाबदारी सोपविण्यात आली. या संचालक मंडळात रा. स्व. संघाच्या तत्त्वज्ञानावर आणि हिंदुत्वावर निष्ठा असणारे अनेकजण होते. त्यामुळे भाऊसाहेबांना असे वाटले की, या मंडळींकरवी आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने येऊ शकतात. संघाचे तत्त्वज्ञानच आपल्याला मांडावे लागेल. याच कारणामुळे त्यांनी संपादकपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली होती; पण बाळासाहेब देवरस यांनी त्यांना त्यांचे लेखनस्वातंत्र्य अबाधित राखण्याची ग्वाही दिली आणि तीच परंपरा आजही ‘तरुण भारत’ सांभाळत आहे.
श्री. भाऊसाहेब माडखोलकर हे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा विषय लावून धरणारे लिखाण करू लागल्यामुळे ‘तरुण भारता’चा चेहरा प्रथमपासूनच उद्दिष्टप्रधान ठरला. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर जे बदल १९५६ साली घडून आले, ते लक्षात घेऊन ‘तरुण भारता’ची एक आवृत्ती पुण्यातून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा एक क्रांतिकारी निर्णय ठरला. ध्येय, उद्दिष्ट आणि विचार यांच्या प्रचारासाठी आणि प्रबोधनासाठी अशी अन्यत्र वेगळी आवृत्ती काढणारे ‘तरुण भारत’ हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे. पुढे बाळासाहेब देवरस श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष झाले.
भाऊसाहेबांच्या निवृत्तीनंतर ‘तरुण भारत’च्या संपादकपदाची जबाबदारी मा. गो. वैद्य यांनी सांभाळावी, असे सुचविण्यात आले. श्री. मा. गो. वैद्य यांनी स्पष्ट केले की, श्री. पां. चि. करकरे हे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांनीच संपादक होणे उचित राहील आणि त्याप्रमाणे करकरे हे संपादक झाले व मा. गो. वैद्य कार्यकारी संपादक म्हणून काम बघू लागले. करकरे यांच्या निवृत्तीनंतर मा. गो. वैद्य यांनी मुख्य संपादक व दि. भा. घुमरे यांनी कार्यकारी संपादक म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.
 
==कालानुरूप बदल==
दैनिक ‘तरुण भारता’ने आधुनिक तंत्रज्ञान आणि कालानुरूप बदल करण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. सर्व जिल्हास्थानी अंक नेण्यासाठी टॅक्सी पद्धती सुरू करणारे ‘तरुण भारत’ हे पहिले दैनिक होते. प्रत्येक जिल्हास्थानी आपले कार्यालय असावे, असा निर्णय घेणारे वृत्तपत्रही ‘तरुण भारत’च होते. काळाची गरज ओळखून पावले उचलणार्‍या तरुण भारतने आणि त्याचे प्रकाशन करणार्‍या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेने छपाई तंत्रातील नवनवीन बदल, जुन्या इष्ट परंपरांना धक्का न लावता अमलात आणले होते. तरुण भारत हे स्वत:चे ब्लॉक डिपार्टमेंट असणारे त्या काळातील एकमेव दैनिक होते. शिवाय दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी तरुण भारतची स्वतंत्र कार्यालयेही त्याकाळी स्थापन करण्यात आली होती.
सरसंघचालकपदाची जबाबदारी आल्यानंतर श्री. बाळासाहेब देवरस यांनी श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्र. बा. उपाख्य बाबासाहेब टालाटुले यांच्यावर सोपविली. सर्वश्री भैयासाहेब खांडवेकर, अनंतराव भिडे, भैयाजी दाणी या सर्वांनी ‘तरुण भारता’च्या अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या अनेक वर्षे समर्थपणे सांभाळल्यात.
 
==आणिबाणी==
१९७५ साली आणिबाणी लागली. अत्याचारी सरकारी वरवंट्याखाली तरुण भारत बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संचालक मंडळ आणि संपादक विभागाने मिळून असा निर्णय घेतला, की काहीही होवो, ‘तरुण भारत’ बंद पडू द्यायचा नाही. त्यावेळी सर्वत्र ‘तरुण भारत’ विरोधी वातावरण निर्माण केले गेले होते. ठिकठिकाणी होणार्‍या कथित ‘फॅसिस्ट-विरोधी’ सभा, ‘तरुण भारत’ बंद पडावा, यासाठीच घेतलेल्या होत्या. तरुण भारताच्या अनेक दिग्गज प्रशासकीय व संपादकीय अधिकार्‍यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. फक्त प्रबंध संचालक भैयासाहेब खांडवेकर आणि कार्यकारी संपादक मामासाहेब घुमरे हेच दोघेजण स्थानबद्ध झाले नव्हते. त्यांनी या झंझावातातही ‘तरुण भारत’चा दीप तेवत ठेवला.
 
==सामाजिक जबाबदारीचे भान==
‘तरुण भारत’ हे केवळवृत्तपत्र नाही, तर आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संकटसमयी देशाला मदतीचा हात देणारी एक संस्था आहे. देशाच्या संकटकाली ‘तरुण भारत’ने वाचकांना मदतीचे आवाहन केले, की भरपूर प्रमाणात निधी संकलित होत असतो, हा नेहमीचा अनुभव आहे. अगदी कोयना भूकंपापासून ते पुण्याच्या पानशेत संकटापर्यंत; किंवा लातूरचा भूकंप असो की मोवाडचे जलथैमान असो; आंध्रातील वादळ असो, की तामिळनाडूतील त्सुनामी असो, मोगा हत्याकांड असो, की कारगिलवरील पाकचे आक्रमण असो, प्रत्येक वेळी ‘तरुण भारत’ने मदतीचे आवाहन केले आणि वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
आणिबाणीनंतरच्या काळात वृत्तपत्र क्षेत्रातली स्पर्धा वाढली. व्यवस्थापनाची नवनवीन तंत्रे आलीत. वृत्तपत्रांच्या धोरणांची व्याख्याही झपाट्याने बदलत गेली. वृत्तपत्राची प्रकाशन संस्था म्हणजे एक परिवार असतो, या संकल्पनेला नाकारणारी धोरणे वृत्तपत्राच्या क्षेत्रात सर्वत्र राबविली जाऊ लागली. त्यावेळी आपल्या कुठल्याही कर्मचार्‍याला काढणार नाही, ही भूमिका घेऊन ‘तरुण भारत’ने आपली वाटचाल सुरूच ठेवली.
 
==नवी झेप==
महालातील गाडीखान्यात असलेला तरुण भारत गांधीहत्येनंतर २८, फार्म लॅण्ड रामदासपेठ या नव्या विस्तृत जागेत आला. आता ‘तरुण भारत’ एमआयडीसीतील नवीन वास्तूत लवकरच स्थानांतरित होत आहे आणि श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे रजिस्टर्ड कार्यालय नागपूरच्या गोकुळपेठ भागात स्थानांतरित होणार आहे. त्या ठिकाणी अद्ययावत सॅटेलाइट संपर्क यंत्रणाही प्रस्थापित करण्यात आली आहे.
दर आठवड्याला ‘तरुण भारत’च्या ४ पुरवण्या निघतात. ‘फुलऑन’ युवकांसाठी आहे, तर ‘छोटे उस्ताद’ बालकांसाठी आहे. ‘आकांक्षा’ महिला वर्गासाठी आहे, तर ‘आसमंत’ ही वैचारिक व साहित्यिक पुरवणी आहे. दरवर्षी निघणारा तरुण भारतचा दिवाळी अंक वैशिष्ट्यपूर्ण असतो. यापूर्वी ‘तरुण भारत’ वासंतिक अंकही काढीत असे. ‘राष्ट्र आराधना’, ‘अटलबिहारी वाजपेयी गौरवांक’ यांनी तरुण भारतचा लौकिक वाढविला आहे. आपल्या या गौरवशाली वाटचालीत तरुण भारतने वृत्तपत्रीय नीतिमूल्यांचे आणि धोरणांचे मांगल्य प्राणपणाने जपत, हे केवळ वृत्तपत्रच नसून ‘विचारपत्र’ही आहे, असा ठसा उमटविला आहे.
विदर्भातील लेखकांच्या व पत्रकारांच्या पिढ्या तरुण भारतने घडविल्या आहेत. अनेक साहित्यकार मराठी साहित्याला दिले आहेत. तरुण भारतने समाजातील विविध विधायक विषयांना एकप्रकारे दत्तक घेऊन त्याबाबत सातत्याने लिखाण केले आहे. विदर्भातील सांस्कृतिक जीवनात समरस होऊन, समाजाला नवनवे उपक्रम व समाज-मनाला इष्ट वळण देण्याची भूमिकाही पार पाडली आहे व आजही त्यात तो तत्पर आहे. एका अर्थाने तरुण भारत ही आज विदर्भाची सांस्कृतिक गरज झालेली आहे.
 
संकेतस्थळ: