"वॉल्ट डिस्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
या प्रशिक्षणाच्या जोरावर आयवर्क्स-डिस्नी या जोडीने आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. कॅन्सास सिटी फिल्म अॅड कंपनी मधल्या फ्रेड हर्मन सह अनेकांना आपल्याकडे नोकरीत घेतले. वॉल्ट डिस्नी आणि आयवर्क्स यांची पहिली मालिका '''लाफ-ओ-ग्राम्स''' सुरू झाली. ही मालिका प्रदर्शीत झाल्याबरोबर खूप गाजली. पण डिस्नी आणि आयवर्क्स यांचा धंद्याचा अनुभव कमी पडल्याने याहीवेळी स्टुडिओ बंद करावा लागला.
 
या अनिश्चित व्यापाराला कंटाळून डिस्नी आणि आयवर्क्स [[हॉलिवुडहॉलिवूड]] येथे गेले. रॉय डिस्नीने यावेळी पैसा जमवून दिला. त्यामुळे '''डिस्नी ब्रदर्स''' नावाची संस्था जन्माला आली. या ठिकाणीच अनेक गाजलेल्या व्यंगचित्र मालिका (Cartoon Series) तयार झाल्या. त्यातील विशेष गाजली ती '''ओस्वाल्ड - द रॅबिट''' नावाची मालिका. या चित्रमालिकेतील प्रमुख चित्रे आयवर्क्सने काढलेली होती. मालिका गाजली तरीही काळाची मागणी चलचित्र (अॅनिमेशन) ची असल्याने धंदा पुन्हा एकदा बंद करावा लागला. यावेळी डिस्नी आणि आयवर्क्स यांनी सुप्रसिद्ध युनिव्हर्सल पिक्चर्सशी एक करार केला. त्याप्रमाणे ओस्वाल्डची दुसरी मालिका सुरू करण्यात आली. तीही मालिका गाजली. पण मोठ्या कंपनीने केलेला करार त्यांच्या बाजुचा होता. चित्रमालिका गाजली पण चित्रांचे मालकी हक्क डिस्नी आणि आयवर्क्स यांच्याकडे नव्हते. वॉल्ट डिस्नी यांनी
चिडून आपल्याच स्टुडिओत नवी चित्रमालिका तयार करण्याचे ठरविले.