"रासपुतीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Rasputin pt.jpg|150px|left|thumb|'''ग्रिगोरी रास्पुतिन''']]
 
ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रास्पुतिन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) [[१० जानेवारी १०]] (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) [[जानेवारी २२]] [[इ.स. १८६९|१८६९]] रोजी [[सायबेरिया|सायबेरियातील]] पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. हा एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतीमान किंवा व्यभिचारी माणसास '''रास्पुतिन''' म्हण्तात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदु, वेडा फकीर होता किंवा एक ठग, स्वार्थी होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. {{संदर्भ हवा}}
 
१९०३ मध्ये रास्पुतिन आपले घरदार सोडून निंद्य व विक्षिप्त कृती करणार्‍या काही धार्मिक गटांसोबत काही काळ राहिला. काही वजनदार उमरावांशी परिचय झाल्याने रास्पुतिन थेट [[निकोलस दुसरा, रशिया]] या झारच्या (उच्चार त्सार, अर्थ राजा) सानिध्यात आला. त्यावेळी युवराज '''अलेक्सेई''' हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रास्पुतिनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रास्पुतिनचा प्रभाव राजदंपतीवर पडला. त्सारिना (अर्थ राणी) '''आलेक्सांद्रा''' हिच्यावर रास्पुतिनचा प्रभाव पडल्याने तर ती कोणत्याही लहान मोठ्या समस्या रास्पुतिन समोर मांडण्यात स्वतःला धन्य समजू लागली. रशियाच्या एकमेव वारसाच्या रक्षणाकरिताच परमेश्वराने रास्पुतिनला पाठविले असल्याचे तिला वाटे. रोमानोव्ह राजपरिवारासाठी [[येशू ख्रिस्त|येशू ख्रिस्ताने]] पुन्हा जन्म घेतला असल्याचे ती बोलून दाखवी.
"https://mr.wikipedia.org/wiki/रासपुतीन" पासून हुडकले